top of page

जरांगे पाटील धनंजय मुंडे यांच्यातील वादाचा पुन्हा तोंड फुटले? धनंजय मुंडे यांच्यासह तीन आरोपींच्या ब्रेन मॅपिंग, नार्को टेस्टची मागणी

छत्रपती संभाजीनगर : अंतरवाली सराटीमध्ये रखरखत्या उन्हात उपोषणानंतर जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पीटलमध्ये डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत. आमदार प्रसाद लाड यांनी आज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर जरांगे पाटील यांनी कथित घातपात प्रकरणावरुन त्यांनी पुन्हा धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या ब्रेन मॅपिंग नार्कोटेस्टची मागणी केली.


मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यातील वाद उभ्या महाराष्ट्रासमोर आहे. जरांगे पाटील यांच्या कथित घातपात प्रकरणात बीडमधील दोन तर जरांगे पाटलांचे जूने सहकारी आमोल खुणे यांना अटक करण्यात आली होती. धनंजय मुंडे यांनी आपली सुपारी दिली, घातापात घडवण्याचा कट रचण्यात आल्याचा अरोपही जरांगे पाटील यांनी वर्षभरापूर्वी केला होता. परळीमधीलएका कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी जरांगे पाटील यांच्या ब्रेन मॅपिंगची मागणी केली होती त्यावर जरांगे पाटील यांनी जालना पोलिस अधिक्षकांकडे थेट अर्ज करत स्वत:सह धनंजय मुंडे यांच्या ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्टची मागणी केली होती. त्यानंतर कथित ऑडिओ क्लिपच्या आधारे बीडमधील दोघांसह अमोल खुणे यास जालना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आरोपींची जामिनवार मुक्तता करण्यात आली.


जरांगे पाटील यांचे जूने सहकारी अमोल खून कारागृहाबाहेर आल्यापासून जरांगे पाटील व त्यांच्या सहकार्‍यांवर गंभीर आरोप करत आहेत. जरांगे पाटील यांच्यार टीकेची कुठलीच संधी न सोडणार्‍या अमोल खुने यांनी जरांगे पाटील यांच्या नार्को टेस्टची मागणी केली आहे. शिवाय जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील उपोषणास प्रति उपोषण करत अमोल खुणे यांनी जरांगे पाटलांना आव्हान केलं आहे.


दुसरीकडे गॅलेक्सी हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल झालेल्या जरांगे पाटील यांनी आज रविवारी (दि.31) माध्यमांशी संवाद साधत कथित घातपात प्रकरणावरुन आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, घातपात करायला लावला माझ्या त्याने गोळ्या घालायच्या होत्या का? जेवनातून औषध घालणार होता हे पुन्हा तपास होवून समोर आलं पाहिजे. कोण बीडचा पीए परळीला जात होता. यामध्ये कोण तिसराच एकनंबरचा आरोपी केलं त्याला एकनंबरचा आरोपी करायला पाहिजे होतं. सध्याही आरोपीला कोण साथ देतंय या संदर्भात आता संगळं लावून धरणार असल्याचंही जरांगे पाटील म्हणाले.


पुढे बोलताना ते म्हणाले त्याच्याशी (धनंजय मुंडे) अरोपींचं बोलनं झालेलं आहे, मग या आरोपींमध्ये तो कसाकाय नाही. तत्कालीन पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि तो नागपूला त्यावेळेस एकत्र बसले होते त्या बैठकीतच त्याचं नांव बाहेर काढलं का यातून.? मी आता तो विषय लावून धरणार आहे आता त्याची माझी आणि त्या तीन आरोपींची तसे तर त्यात अनेकजण आहेत ते सगळेच घ्यायला लावणार आहे. पहातो नार्कोटेस्ट कशी होत नाही.त्या तीन आरोपींची मी दखलच घेत नाही लवकरच गृहमंत्री तथा मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगत आमदार धनंजय मुंडे यांच्यासह तीन आरोपींची ब्रेन मॅपिंग, नार्कोटेस्टची मागणीही यावेळी जरांगे पाटील यांनी केली.

Comments


bottom of page