top of page

जरांगे पाटील मंत्री भुजबळांमध्ये वाक्युद्ध!

चार दिवस मुंबईत हैदोस घातला- भुजबळ

त्याला हैदोस म्हणतात का?, याला तिकडं नागालँड... ला सोडलं पाहिजे - जरांगे पाटील

ree

जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार सरकारने हैदराबाद गॅझेटिअर लागू करण्याचा जीआर काढला. सरकारच्या निर्णयामुळे ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याचा आरोप करत ओबीसी नेत्यांनी सरकारच्या जीआर विरोधात रान उठवलं आहे. मंत्री छगन भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्यातील वैचारीक वैमानणुष्य उभ्या महाराष्ट्राला ज्ञात आहे. त्यातच आता भुजबळ यांनी सरकारच्या जीआर विरोधात सर्व बाजूने लढाईचा इशारा दिला आहे. आज छगन भुजबळ लातूर दौर्‍यावर होते यावेळी माध्यमांशी बोलताना भुजबळ यांनी मुंबई येथील मराठा आंदोलनावर प्रतिक्रिया देत चार दिवस मुंबईत हैदोस घातला, मागील काळात जरांगेच्या कार्यकर्त्यांनी बीड जाळल्याचं म्हणत जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.


दरम्यान भुजबळ यांच्या टीकेला उत्तर देताना जरांगे पाटील म्हणाले की, अक्कल वाटत असताना हा कुठे होता काय माहित, त्याला हैदोस म्हणतात का? लेकरं मुंबईला गेले आणि आनंद घेतला, याला तिकडं पाठवयला पाहिजे नेपाळ बिपाळकडं. तिकडं आहेत नागालँड... इंग्लंड. बिंगलंड असे म्हणत जरांगे पाटील यांनी भुजबळांच्या टीकेला सडकून प्रत्यूतर दिले.

मराठा नेत्यांना आव्हान करत भुजबळ म्हणाले की, मराठा समाजाला 10% टक्के मराठा आरक्षण, इडब्ल्यूएस, ओपनचं आरक्षण नकोय का? ओबीसीतच पाहिजे का? याचं उत्तर मला सुशिक्षीत मराठा समाजाच्या लोकांनी द्यावं. अशिक्षीत लोकांकडून मला उत्तराची अपेक्षा नाही. त्याचबरोबर मराठा समाजाचे केंद्रात मंत्री राहिले आहेत,राज्यात मंत्री आहेत त्यांनी पुढे येऊन बोलावं असंही भुजबळ म्हणाले.


भुजबळांच्या वक्तव्यांवर संताप व्यक्त करत जरांगे पाटील म्हणाले की, मी शिक्षीत असो वा अशिक्षीत तुला तर रडकुंडीला आणला ना, तुझं जे पण होतं मराठ्यांना आरक्षण नाही मिळू द्यायचं. त्याच्यावर तर मी पाणी फेरलं. मराठवाडा आरक्षणात गेला, पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात गेला आम्ही दोन्ही विभागाचे बांधव एकमेकांना कडाडून आणि कट्टर साथ देणार आहोत. एकमेकांच्या सुखा, दुखा:त ताकदीने धाऊन जाणार आहोत. आम्ही पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा असा भेदाभेद ठेवणार नाहीत आता तुम्हाला दसरा मेळाव्याला नारायण गडावर दिसले कसा तुटून मराठा एक आहे तो.

Comments


bottom of page