जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट: तिसरा आरोपी पोलिसाच्या ताब्यात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय कांचन साळवी यांस अटक
- Navnath Yewale
- Nov 12, 2025
- 2 min read

जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आलेल्य जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. जरांगे पाटील यांच्या घातपाताचा कट रचल्याच्या प्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे कांचन साळवी असे या आरोपीचे नाव आहे. दादा गर आणि अमोल खुणे यांच्याशी कांचन नावाच्या व्यक्तीचा सबंध असल्याचा आणि तो धनंजय मुंडे यांचा पीए असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. दरम्यान याच प्रकरणाचा अधिक तपास करत रात्री (11 नोव्हेंबर) उशिरा कांचन साळवी याला जालना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्या घेऊन, चौकशी अंती त्याला अटक केलं आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाप्रकरणी कांचन साळवी याला जालना पोलिसांनी अटक केली आहे. साळवी हा आमदार धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला होता, जे आरोप मुंडे यांनी फेटाळले आहेत. अटकेपूर्वी कांचन साळवीने आपली बाजूू मांडली होती, गरडसोबत माझा आर्थाआर्थीक पण संबंध नाही. जे पण काही चौकशी असेल, नार्कोटेस्ट असेल, त्यावर मी पूर्णपणे सामोरं जायला तयार आहे. ‘ या अटकेमुळे आता पोलिस तपासात साळवी, गरड आणि अमोल खुणे यांच्यातील संबंधाची चौकशी केली जाईल. दरम्यान, कालच माध्यमांसमोर येऊन कांचन साळवी याने आपण अमोल खुणेला ओळखतो. मात्र दादा गरडशी आपला कसलाही संबंध नव्हता, तोच आपल्याला काही रेकॉर्डिंग देण्याच्या बदल्यात पैसे मागत होता, असा अरोप कांचन साळवी यान केला होता.
मराठा आंदोलक मनेाज जरांगे पाटलांना यांना जीवे मारण्याचा कट रचल्याप्रकरणी, गोंदी पोलिसांनी गेवराईतून अमोल खुणे आणि विवेक उर्फ दादा गरुड या दोघांना अटक केली. कोर्टाने या दोन्ही आरोपींना 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या दोन आरोपीपैकी अमोल खुणे हा मनोज जरांगे पाटील यांचा समर्थक असल्याचं सांगितलं जात आहे.
मनोज जरांगे पाटलांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेत आपल्या हत्येची सुपारी धनंजय मुंडेंनी दिली असा खळबजनक आरोप केला होता. त्यानंतर धनंजय मुंडेंनीही याला उत्तर देत हे आरोप फेटाळले होते. तसंच या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली. यासोबतच आरोपींसह आपली आणि मनोज जरांगेची नार्को टेस्ट करण्याची मागणीही धनंजय मुंडेंनी केली.



Comments