top of page

जरांगे पाटीलांच्या आंदोलनाला पाठिंबा पण...! संभाजीनगरमध्ये क्रांती मोर्चा आक्रमक

छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक जरांगे पाटील नेहमीच सडेतोड आणि थेट वक्तव्यातून टीका करतात. अनेकवेळा मंत्री, आमदार,राजकारण्यांचा एकेरी भाषेत उल्लेख, शिवाय शब्दशैलितून शिवराळ भाषेचा उल्लेख जरांगे पाटील यांच्याकडून होत असतो. पण आता जरांगे पाटील यांच्या भाषेवरून संभाजीनगरचा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी पत्रकार परिषदेत आंदोलनाला पाठिंबा पण जरांगे पाटलांनी शिवराळ भाषेचा उल्लेख टाळावा असा इशारा दिला आहे.


क्रांती मोर्चाच्या इशार्‍यामुळे मराठा आंदोलनात फूट पडल्याचे बोललं जात असताना जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत याचे खंडन करत नेत्याला बोलल्यावर त्यांना राग येत असल्याचं सांगत क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना इशारा दिला आहे.


मराठा आंदोलक जरांगे पाटील यांच्या भाषेवरून संभाजीनगर सकल मराठा समाज व क्रांती मोर्चा च्या वतिने समन्वयकांनी पत्रकार परिषदे घेतली. मनोज जरांगे पाटील हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात एकेरी आणि अक्षेपार्ह भाषेचा वापर करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. जरांगे पाटील वापरत असलेल्या भाषेमुळे मराठा समाजाची देशभरात नाचक्की होत असल्याची टीका यावेळी करण्यात आली. मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी शिंदे नेहमीच तत्पर राहिले आहेत.


असे असतांना त्यांच्याबद्दल अश्लील व खालच्या पातळीवरील भाषा वापरणे योग्य नाही. अशी भूमिका सकल मराठा समाजाने मांडली. देशात महात्मा गांधीपासून अण्णा हजारे यांच्यापर्यंत अनेकांनी उपोषण केली. मात्र, आंदोलनादरम्यान शिवीगाळ किंवा खालच्या पातळीवरील भाषेचा वापर केला नाही, असा दाखलाही पत्रकार परिषदेत देण्यात आला. त्यामुळे मराइा समाजाच्या आंदोलनाला गालबोट लागेल. अशी भाषा टाळावी आणि संयमाने भूमिका मांडावी असे अवाहन सकल मराठा समाजाच्या वतिने सागर देवकर पाटील, सुभाष बागल पाटील यांनी केले.


क्रांती मोर्चाच्या समन्वयाकांच्या पत्रकार परिषदेतील आरोपावर जरांगे पाटील यांनी पवलटवार करत मंत्री विखेंसह चार मंत्री आणि दोन आमदारांनी क्रांती मोर्चाचं वाटोळं केलं आहे. अर्धे समन्वयक, अभ्यासक फोडायचे आणि आपसात अंगावर घालायचेे हे त्यांचे उद्योग आहेत. माझ्या विरोधात समन्वयाकांच्या बैठका घेवून पत्रकार परिषदा घ्यायला लावयच्या. नेत्यांना बोललं म्हणजे यांना राग येतो, मराठा समाजाची फसवणूक करणार्‍या नेत्यांना जाब विचारणं महत्वाचं नाही का? असा सवाल उपस्थित करत जरांगे पाटील यांनी क्रांती मोर्चाच्या समन्वयकांवर पलटवार केला.

Comments


bottom of page