मराठावाडा मुक्तीसंग्राम दिनी परभणीत धनगर आरक्षण महामोर्चा- दिपक बोर्हाडे
- Navnath Yewale
- 38 minutes ago
- 1 min read

बीड: धनगर समाजास एसटी प्रवर्गाच्या आरक्षण मागणीसाठी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी (दि.17,सप्टेंबर) परभणी येथे महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात दुसर्या क्रमांकावर असलेल्या धनगर समाजाचा केवळ राजकीय स्वार्थासाठी वापर करून फसवणूक केल्याचा आरोप धनगर आरक्षणाचा एल्गार पुकारण्यासाठी समाजबांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन धनगर आरक्षण आंदोलक दिपक बोर्हाडे यांनी केले.
परभणी येथे (दि.17) सप्टेंबर रोजी धनगर आरक्षण महामोर्चाचे आयोजनाच्या पार्श्वभूमिवर धनगर आरक्षण आंदोलक दिपक बोर्हाडे यांनी बीड येथे पत्रकार परिषदेत घेतली. पत्रकारांशी संवाद साधताना आंदोलक बोर्हाडे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचे अश्वासन दिले होते. विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच कॅबिनेट बैठकीत धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याचे अश्वासन दिले होते.
मात्र, शेकडो कॅबिनेट बैठका होऊन देखील अद्याप मुख्यमंत्र्यांना धनगर आरक्षणाची आठवण झाली नाही. धनगर समाजाचा केवळ राजकीय स्वार्थासाठी वापर करण्यात आला आहे. आम्ही फसतो म्हणून आम्हाला वारंवार फसवण्यात येत आहे. मात्र, आता राज्यात दुसर्या क्रमांकाचा असलेला धनगर समाज हुशार झाला आहे. धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी राज्यभरात मोठं आंदोलन उभाण्यात येत आहे त्याची सुरूवात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी परभणी येथून महामोर्चाने होत आहे. हक्काच्या मागण्यांसाठी धनगर समाज बांधवांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन आंदोलक दिपक बोर्हाडे यांनी केले आहे.
परभणी हे ठिकाण मराठवाड्याच्या मध्यस्थानी आहे. मराठवाड्याच्या जिल्हाभरातून धनगर समाज परभणी येथे एकत्र येणर आहे. त्यासाठी जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांनी मोर्चात सहभागी होऊन साक्षीदार होण्याचं अवाहन त्यांनी यावेळी केलं.



Comments