top of page

मराठ्यांच्या रॅलीवर हल्ला करण्याचं षडयंत्र, विखेंनी आम्हाला फसवून फडणवीसचं स्वप्न पूर्ण केलं- जरांगे पाटील

अंतरवाली: मराठा आरक्षणासंदर्भात सरकाराने निर्णय घेतले आहेत. अंमलबजावणीही सुरू आहे. यामध्ये त्यांचं समाधान होत नसेल, तर सरकारचे सर्व पर्याय संपले आहेत. शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार नाही, जरांगे पाटलांनी सरकारला समजून घ्यावं असं मराठा उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री विखे पाटील यांच्या या वक्तव्यावर जरांगे पाटील यांनी जोरदार पलटवार करत फडणवीस आणि विखेंनी मराठ्यांच्या रॅलीवर हल्ला करण्याचं षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोप जरांगे पाटलांनी केला.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपचाराला विरोध केल्याने मंगळवारी (दि.8) मध्यरात्री अचानक प्रकृती खालवली. जरांगे पाटील यांच्या मागण्यांसदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी मध्यरात्री तातडीची बैठक संपन्न झाली. त्यामुळे आज सरकारचे शिष्टमंडळ आंतरवालीत येण्याचे संकेत होते. मध्यरात्री डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जरांगे पाटील यांनी उपचार घेतले.


त्यातच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर मोठं विधान केलं विखे पाटील म्हणाले, ‘ सरकारने मराठा आरक्षणा संदर्भात निर्णय घेतले आहेत. जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर कामही सुरू आहे. त्यात त्यांचं समाधान होत नसेल तर सरकारकडील सर्व पर्याय संपले आहेत. जरांगे पाटील यांनी आता सरकारला समजून घ्यावं’ मंत्री विखे पाटील यांच्या या विधानावर जरांगे पाटील यांनी जोरदार पलटवार करत गंभीर आरोप केले.


प्रकृती खालवल्याने जरांगे पाटील यांनी उपचार सुरू असताना मंगळवारी (दि.8) पत्रकार परिषदेतून माध्यमांशी संवाद साधला. जरांगे पाटील म्हणाले की, तुमच्याकडं एवढेच पर्याय होते का?. हैदराबाद गॅझेटप्रमाणे कोणते प्रमाणपत्रं दिले, सातारा आणि कोल्हापूर गॅझेटची मूहिनाभरात अंमलबजावणीचं अश्वासन दिलं होतं. वर्ष लोटलं तरी अद्याप अंमलबजावणी नाही. मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द केले हेच पर्याय होते का? असा उलट प्रश्न उपस्थित करत जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री विखे पाटील यांच्यावर निशाना साधला.


जोपर्यंत तुमच्याकडं मराठा उपसमितीचा शिक्का आहे तो पर्यंत तुम्हाला मराठ्यांचे कामं करावेच लागतील. आंतरवालीत या अथवा येऊ नका, तुम्हाला कोणी बोलवत नाही. मुंबईतही तुम्हाला कोणी बोलावलं नव्हतं. अर्ध्यापुरात मराठा समाजाला सोडून माघारी आले. सरकारला समजून घ्यायला काय सरकार आमचं बाप आहे का?. मराठा उपसमितीच्या इतिहासातला सर्वात निष्क्रीय आणि मराठ्यांचं वाटोळं करणारा कोण असेल तर विखे पाटील आहत असं जरांगे पाटील म्हणाले.


पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले, काहीच करता आलं नाही विखेंना, बोलल्यावर राग येतो. तुमचं आता ठरलेलं आहे मराठ्यांच्या रॅलीवर हल्ला करायचा. मुख्यमंत्री आणि विखेंच षडयंत्र ठरलेलं आहे. विखेंना फडणवीस मराठ्यांची कामे करू देत नाही किंवा विखेंनी समाजाशी घात करून फडणवीसांचं स्वप्न पूर्ण केलं. फडणवीसांचं गुणगान आणि शरद पवारांनी मराठ्यांना काहीच दिलं नाही या घोकम पट्टीसाठीच विखेंना आंतरवालीत वारंवार आंतरवालीत पाठवण्यात आलं. मराठा उपसमितीचे अध्यक्ष असताना तुम्हाला साधा तलाठी मोजत नाही, आयएएस, आयपीएस अधिकारी काय मोजणार आहेत. शिरसाट आणि बावनकुळेंनी आत्ता वाटोळं केलं त्यांच काय केलं तुम्ही मराठ्याला कलंक असल्याचा घणाघातही त्यांनी केला.


मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना फोडून माझ्या विरोधात पत्रकार परिषदा घ्यायला लावता, माझ्या कटातील आरोपींना भेटता. माझ्याकडं फोटो आहेत. मंत्री विखे सह चार मंत्री आणि दोन आमदारांनी कट रचून मराठा क्रांती मोर्चा संपवला. आर्धे समन्वयक फोडून आर्ध्यांच्या आंगावर घालणे, हा एवढा उद्योग त्यांनी केला. क्रांती मोर्चाचं वाटोळं या पाच सहा जणांनी केलं आहे. मराठ्यांना फसवलं याची किंमत मोजावी लागणार विखे पाटलांना. वर्षभर मराठ्यांच्या लेकराबाळांचं वाटोळं केलं याची किंमत विखेला मोजावी लागणार असा इशाराही त्यांनी दिला.


विखेंचं राजकारण ज्ञाणाच्या नाही तर पैशाच्या जोरावर. विखेंनी प्रसंगी फडणवीसांनाही खेटायला पाहिजे होतं, मराठ्यांच्या मनात घर करण्याची संधी विखेंनी घालवली. मात्र त्यांना आता पळ काढता येणार नाही. असे पळपूटे मराठ्यांच्या समितीचे अध्यक्ष म्हटल्यावर मराठ्यांचं कसं कल्याण होणार. विखे फडणवीसांपुढे हातबल झाले आहेत. भाजपचं ऐकून विखेंनी मराठ्यांचं वाटोळं केलं. मराठा समाजास आम्ही जे दिलं ते इतर कोणीही दिलं नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावरून जरांगे पाटील म्हणाले. या पलिकडं फडणवीस काही बोललेच नाहीत. 12 सप्टेंबर ला खेटू आपण आमची मुंबईला जाण्याची तयारी सुरू झाली असल्याचंही ते म्हणाले.

Comments


bottom of page