जरांगे पाटीलांना ‘झेडप्लस’ सुरक्षा द्या- क्रांती मोर्चा गुन्हे दाखल करून दोषींवर कठोर कारवाईची आमदार, खासदारांची मागणी
- Navnath Yewale
- Nov 7, 2025
- 2 min read

वडीगोद्री, (जालना): मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या घातपाताचे धक्कादायक प्रकरण समोर आल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. प्रकरणाचे गांभीर्य राखून जरांगे पाटील यांना ‘झेडप्लस’ सुरक्षेची मागणी क्रांती मोर्चाच्या वतिने करण्यात आली आहे. दरम्यान, अडीच कोटी रुपयांच्या डिलचं प्रकरण समोर आल्याने आता विविध आमदार, खासदारांनी गुन्हे दाखल करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या खूनाची आडीच कोटी रुपयांना सुपारी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, जालना पोलिसांनी संशयित दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. संशयितांपैकी एक अमोल खुने हा एकेकाळचा जरांगे पाटील यांचा सहकारी असल्याचे समोर आले आहे. जरांगे पाटील यांचा घातपात करण्याचा कट भाऊबीजीपासून शिजल्याचं सांगण्यात येत आहे. संशयित आमोल खुने व ताब्यातील दुसर्या आरोपीची कथित ऑडिओ क्लिप समोर आली आहे. ज्यामध्ये काही दिड कोटी, एक कोटी बाबत संवाद करण्यात आला आहे. दरम्यान परळी येथे केंद्रीय कृषी मंत्री शिवाराजसिंह चौहान यांचा कार्यक्रम असल्याने डिएम बीजी असून शुक्रवारी पैशाची देवान घेवान करण्यात येणार असल्याचा भाष्य करण्यात आलं आहे.
जरांगे पाटील यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेतून माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर घणाघात करत कटाचा सूत्राधार धनंजय मुंडेच असल्याचा खुलासा केला. या कटामध्ये आणखी काही लोक असल्याचा दावा करत आरोपी आणि धनंजय मुंडे यांच्यातील संवाद जनतेसमोर येण्यासाठी सीडीआरची मागणी केली.
यावर धनंजय मुंडे यांनीही पत्रकार परिषदेतून जरांगे पाटील यांचे आरोप फेटाळत राज्यात पहिल्यांदा मराठा आरक्षणासाठी बीड जिल्हा परिषद आणि परळी नगरपरिषदेमध्ये मराठा आरक्षणाचा ठराव घेतला, जरांगे पाटील यांच्या परळी येथील आंदोलनाला मदत केल्याचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांकडे सीआयडी चौेकशीसह दोघांच्याही नार्कोटेस्ट, ब्रेन मॅपिंग ची मागणी केली.
जरांगे पाटील यांनी पुन्हा पत्रकार परिषदेद्वारे धनंजय मुंडे यांच्या आव्हाला प्रत्यूत्तर देत पहिल्यांदा स्वत: सर्व टेस्टला सामोरं जाण्यास तयार असून “आगोदर माझी नार्कोटेस्ट करा, ब्रेन मॅपिंग करा नंतर त्याची करा, होवून जाऊद्या एकदा दुधाचं दुध आणि पाण्याचं पाणी” असं म्हणत निशाना साधला. तपासाचा भाग म्हणून मी काही गोष्टी माध्यमांसमोर आणु इच्छित नाही. चार दोन दिवसात सर्व काही माध्यमांसमोर आणणार असल्याचंही जरांगे पाटील म्हणाले.
प्रकरणाचे गांभीर्य राखून शासनाने तात्काळ जरांगे पाटील यांना झेडप्लस सुरक्षा देण्याची मागणी क्रांती मोर्चा (कोल्हापुर) च्यावतिने करण्यात आली आहे. सोलापुरातील सकल मराठा समाजाच्या वतिने जिल्हाधिकारी यांना निवेदनावद्वारे दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
त्याचबरोबर जरांगे पाटील यांच्या घातपाताचा प्रकार पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा आहे. हा शिव,शाहू, फुले, आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे. विचाराची लढाई विचारानेच लढली पाहिजे ही इथली संस्कृती आहे. त्यामुळे संस्कृतीला नख देणार्या या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी शिवसेना (उबाठा) चे नेते खासदार संजय राऊत, खासदार बजरंग सोनावणे, खासदार कल्याण काळे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार विजयसिंह पंडीत आदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रसिद्धी पत्राद्वारे केली आहे.



Comments