जरांगेंना राजकीय वरदहस्त, उपमुख्यमंत्री शिंदे, विखे यांचा छुपा पाठिंबा; मनोज जरांगेंना अटक करा - वकील सदावर्ते गुणा सदावर्ते हा महाराष्ट्रावरून ववाळून टाकलेला मराठा द्वेषी - वकील केदार
- Navnath Yewale
- 2 days ago
- 2 min read

मुंबई/धाराशिव: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील शनिवार (दि.29) पासून आंतरवाली (सराटी) येथे बेमूदत उपोषस सुरू करीत आहेत. सरकारने जर मागण्या मान्य नाही केल्या तर, लाखो समाजबांधवांसोबत मुंबईत आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला. त्यानुसार जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी मुंबईतील आझाद मैदान पोलिस ठाण्यात परवानगीचा अर्ज दाखल केला आहे. काळकुटे यांच्या अर्जाला निकाली काढण्यात यावा म्हणून वकील गुणरत्न सदावर्ते यांनीही आझाद मैदान पोलिसात अर्ज दाखल केला असून माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी जरांगे पाटील यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले.
वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आज आझाद मैदान पोलिस ठाण्यात गंगाधर काळकुटे यांनी दिलेल्या अर्जानुसार जरांगे पाटील यांना परवानगी देण्यात येवू नये असा अर्ज दिला. यावेळी माध्यमांशी बोलताना सदावर्ते यांनी जरांगे यांना कोणीतरी फिड करत आहे त्यामुळे ते असे बोलत आहे. महत्वाच्या व्यक्तींबद्दल जी भाषा वापरली जात आहे ते सर्व रेकॉर्ड केले जात आहे. जरांगे यास तातडीने अटक करा अशी मागणी करत एकनाथ शिंदेसह मोठ्या नेत्यांचा जरांगे यांना छुपा पाठिंबा असल्याचा अरोपही सदावर्ते यांनी केला आहे.
जरांगे ज्या पद्धतीने बरळत आहे, हे त्याला कोणीतरी फिड केलेले आहे असं वातंय, आंदोलन करण्याची मुभा सर्वांना आहे, पण संविधानाच्या आधीन राहून आंदोलन करावे लागते. जी भाषा वापरली जात आहे, महत्वांच्या व्यक्तीबद्दल भाषा वापरली जात आहे. हे अत्यंत गंभीर आहे सर्वकाही रेकॉर्डींग केले जात असल्याचं सदावर्ते म्हणाले.
गंगाधर काळकुटे यांनी अर्ज दिला आहे. त्या पत्रावर निर्यय करा असे आम्ही सांगितले आहे. मंत्रालयातील कोणाची वाट पाहू नका. या धमक्यांना गांभीर्यानं घ्या अशी आमची मागणी आहे. हे आंदोलन राजकीय फायद्यासाठी होत आहे. मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री बिगर मराठा असल्याने हे आंदोलन होत आहे. मुख्यमंत्री आणि महसूलमंत्री बिगर मराठा असल्याने हे आंदोलन होत आहे. राजकीय अभय असल्यानं ही भाषा वापरली जात आहे. उदय सामंत यांची बॉडी लँग्वेज सांगते. एकनाथ शिंदे नाही तर सत्तेतील मंत्री विखे पाटलांची भुमिका तपासली पाहिजे, हे जे चाललंय ते ठरवून चाललं आहे. या आंदोलनाविरोधात जे काही कायदेशीर मार्ग आहेत ते वापरू असंही सदावर्ते यावेळी म्हणाले.
महाराष्ट्रवारून ववाळून टाकलेला मराठा द्वेषी - वकील योगश केदार : महाराष्ट्रवारून ववाळून टाकलेला एक वकील गुणा सदावर्ते या सदावर्तेनं मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनावर बंदी घालण्यासाठी आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये एक अर्ज केलाय. गंगाधर काळकुटे यांच्या अर्जावर निर्णय करावा असा अर्ज करत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर काही चुकीचे आरोप केलेत. मी सदावर्तेचा जाहिर निषेध करतो. सदावर्तेनी शिंदे साहेबांवर आरोप करण्यापूर्वी एखादा पुरावा महाराष्ट्रासमोर द्यायला पाहिजे. आज जर ते खरच मुंबईच्या हितासाठी आझाद मैदान पोलिस स्टेशनला गेले असते, तर त्यांनी ओबीसींच्या नावानं ओबीसी नसताना मुंबईत येऊन लाखोंची गर्दी करतो म्हणणार्या लक्ष्मण हाकेंच्या विरोधात का तिथं अर्ज दिला नाही. लक्ष्मण हाकेंच्या अर्जावर निर्णय घेण्याचं का बोलले नाहीत. आणि केवळ मराठा जातीच्या द्वेषापोटी हा सदावर्ते असं जर कायमपणे वागत असेल. तर यापूर्वी सदावर्तेची न्यायालयामध्ये वकील करण्यासाठीची जी सनद आहे ती रद्द करण्यात आलेली आहे. याही पुढं आम्ही मराठा वकील म्हणून सदावर्तेच्या या असल्या काळ्या गुणांचा निषेध करण्यासाठी योग्य ठिकाणी आम्ही तक्रारी करणार आहोत.



Comments