आयएएस तुकाराम मुंढेंनाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करा, थेट केंद्रिय मंत्री अमित शाहांकडे मागणी
- Navnath Yewale
- 13 hours ago
- 2 min read

मुंबई: महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या कारवायांचा धडका सुरू आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे. निर्भिड आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी एफडीएच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून भेसळखोरांसह राज्यातील विविध हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, तसेच अने क्विक- कॉमर्स कंपन्यांना कठोर कारवायांचा दणका दिला आहे. या कारवायांमुळे मुंढेचे राज्यासह देशभरात कौतुक होत असतानाच आता त्यांना थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मुंबईतील आम्ही गिरगावकर सेघटनेने राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढेंच्या कामाचं कौतुक करताना थेट त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करा अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी ही मागणी थेट केंद्रिय गृहमंत्री व भाजपचे राजकीय चाणक्य म्हणून ओळख असलेल्या अमित शाह यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मुंबईतील हुतात्मा चौकात ‘ मराठी एकीकरण समिती’ व आम्ही गिरगावकर संघटनेच्या वतिने रविवारी (दि.30,ऑगस्ट)आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनापूर्वीच या दोन्ही संघटनांनी थेट केंद्रिय मंत्री अमित शाह यांनाच एक पत्र पाठवलं आहे. यसा पत्रातच या संघटनांनी एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करावे, अशी मागणी केली आहे.
याच पत्रात परप्रांतिय रिक्षा- टॅक्सी चालकांना मराठी येत नसतानाही परवाने दिले जात असल्याचा मुद्दा आम्ही गिरगावकर संघटनेने उपस्थित केला आहे. याचवेळी या संघटनेनं पत्रात मराठी भाषिकांच्या घरांवर हातोडा चालवला जात असल्याचा गंभीर आरोप केल्याने एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
तसेच ‘ मराठी एकीकरण समिती’ व ‘ आम्ही गिरगावकर’ संघटनेनं अमित शाहांना पाठवलेल्या पत्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचंही कौतुक केलं आहे. या पत्रात संघटनांनी मराठी माणसाचा महत्वपूर्ण मुद्दा मांडताना परप्रांतीय रिक्षा- टॅक्सी चालकांना मराठी येत नसतानाही परवाने दिले जातआहेत असा आरोपही केला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांतील राखीव मैदाने, राखीव भूखंड, महत्वाच्या जागा बांधकाम व्यवसायिक श्रीमंत लोकांच्या घशात घातल्या जता असल्याचा आरोप करत संघटनांनी खळबळ उडवून दिली आहे. सरपकार महाराष्ट्राचे असतानाही येथील मंत्री राजस्थान, गुजरात आणि बिहारचे अशी टीकाही करण्यात आली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रामाणिक, शिस्तप्रिय आणि धडाकेबाज भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकारी म्हणून तुकाराम मुंढेंची स्वत: अशी ओळख निर्माण झाली आहे. मुंढे हे त्यांच्या प्रशासन, नियमबाह्य कामांवरील कठोर कारवाई आणि लाचलुचपत/ भ्रष्टाचाराविरोधी भूमिकेसाठी कोणतीही तडजोड न करणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांना सामान्य जनतेमध्ये ‘ सिंघम’ अधिकारी म्हणूनही संबोधले जाते.
तुकाराम मुंंढे हे त्यांच्या कणखर भूमिकेमुळे नेहमीच चर्चेत असतात आणि त्यांच्या कार्यकाळात त्यांनी धडाकेबाज व कठोर निर्णय घेतले आहेत. त्यांच्यासाठी प्रामाणिक व शिस्तप्रिय कार्यशैलीच त्यांच्या कारकिर्दीत अनेकदा अडचणीची ठरली आहे. त्याचमुळे त्यांना 21 वर्षाच्या सेवेत तब्बल 25 बदल्यांना सामोरे जावे लागले. सध्या महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाचे आयुक्त म्हणून कार्यरत असतानाही त्यांनी आपल्या कामाचा धडाका कायम ठेवला आहे.



Comments