जव्हार येथे पालघर काँग्रेसची आढावा बैठक संपन्न
- Navnath Yewale
- Sep 11
- 1 min read

जव्हार : पालघर जिल्हा काँग्रेस च्या वतीने विक्रमगड, जव्हार, मोखाडा येथे मंगळवारी (दि.9) आढावा बैठकांचे आयोजन करण्यात आले .बूथ स्तरावरच्या कार्यकर्त्यापासून तालुकाध्यक्ष पर्यंत सर्वांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. विक्रमगड विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यकर्त्याच्या जीवावर लढण्याचा ठाम निर्णय घेण्यात आला. भाजपाला कंटाळलेली आदिवासी जनता ओबीसी, अल्पसंख्यांक या समाजांचा असलेला भाजपावर रोष लक्षात घेता या वेळेला काँग्रेस मोठ्या फरकाने जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये आपले वर्चस्व निर्माण करेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी दिला.
या दौऱ्यात जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे वरिष्ठ उपाध्यक्ष मधुकर चौधरी बळवंत गावित मीडिया सेलचे रोशन पाटील, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष असद चुनावाला आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटील ओ बि सी सेलचे जिल्हाध्यक्ष भरत पालवी विक्रमगड येथे तालुकाध्यक्ष घनश्याम आळशी जव्हार येथे तालुकाध्यक्ष संपत पवार मोखाडा येथे तालुकाध्यक्ष जमशेद लारा व विविध सेलचे कार्यकर्ते पदाधिकारी या कार्यक्रमांना उपस्थित होते.



Comments