जव्हार शिक्षण विभागकडून १००% जिल्हा परिषद शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रतिज्ञा...
- Navnath Yewale
- Sep 13
- 1 min read

जव्हार : तंबाखूमुक्त शाळा अभियान अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा जव्हार येथील के. व्ही. हायस्कूल व आर. वाय. ज्युनिअर कॉलेज, जव्हार जिल्हा पालघर येथे संपन्न झाली. तालुकास्तरावरील तज्ज्ञ मार्गदर्शक, केंद्र समन्वयक, मुख्याध्यापक शिक्षक, समग्र शिक्षा टीम कार्यशाळेसाठी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन पंचायत समिती जव्हारच्या गटशिक्षणाधिकारी विजया टाळकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
कार्यक्रमात सलाम मुंबई फाउंडेशनचे जिल्हा मार्गदर्शक संजय ठाणगे यांनी तंबाखूमुक्त शाळेसाठी आवश्यक असलेले ९ निकष सविस्तरपणे उलगडून सांगितले. त्यांनी विविध उदाहरणे देत प्रत्यक्ष छायाचित्रांच्या माध्यमातून माहिती दिली. याचबरोबर टोबॅको-फ्री स्कूल अॅप कसे वापरायचे, त्याचे फायदे आणि शाळांमधून व्यसनमुक्तीचे वातावरण कसे निर्माण करता येईल, याबाबतही मार्गदर्शन केले. विजया टाळकुटे यांनी यावेळी उपस्थितांना जव्हार मधील १००%जिल्हा परिषद शाळा तंबाखू मुक्त करण्याचे आवाहन केले.
तसेच खऱ्या अर्थाने समाजात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्याची गरज सर्व शिक्षक आणि पर्यवेक्षीय यंत्रणेची असून आपण सर्वांनी ती पार पाडूया असे सांगून तंबाखू मुक्तीबाबत घोषणाही दिल्या. कार्यशाळेची सांगता उपस्थित सर्वांना तंबाखूमुक्त जीवनाची शपथ देऊन करण्यात आली.कार्यशाळेचे सूत्रसंचालन .अमोल मोकाशी यांनी केले.
या कार्यक्रमास शिक्षण विस्तार अधिकारी . पुंडलिक चौधरी, मनीषा डांगे, . ईश्वर पाटील, , अनंता महाले, श्रावण वातास, प्रकल्प विस्तार अधिकारी . सोमनाथ धोंडे तसेच लोकनियुक्त सरपंच . दिनेश जाधव ग्रा.पं. पिंपळशेत-खरोंडा यांच्यासह इतर सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Comments