जामखेड हादरलं; बाप-लेकाने गळफास घेवून जीवन संपवलेएकाच झाडाला, एकाच कापडाने घेतला गळफास, सर्वत्र हळहळ
- Navnath Yewale
- Jan 4
- 1 min read

आहिल्यानगर/ जामखेड: शहरात वडील आणि मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. शहरातील नवीन कोर्टरोड व म्हाडा कॉलनीच्या बाजूला असलेल्या एका शेतात वडील व मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे त्या मॅटच्या कापडाने मुलाने गळफास घेतला, त्याच मॅटच्या कपड्याने वडीलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. कानिफनाथ ज्ञानदेव पवार वय 45 वर्षे व सचित कानिफनाथ पवार वय 16 वर्षे रा. आरोळे वस्ती जामखेड अशी आत्महत्या केलेल्या बाप लेकांची नावे आहेत.
जामखेड शहरातील आरोळे वस्तीवर कानिफनाथ ज्ञानदेव पवार हा अपल्या कुटुंबासह राहत होते. दोन तीन दिवसांपूर्वी त्यांची पत्नी माहेरी गेली होती. याच दरम्यान शुक्रवारी (दि.2) रात्री कानिफनाथ यांचा मुलगा सचित कानिफनाथ पवार या दोघांचे वाद झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे मुलाग सचित हा रात्रीच्या सुमारास घराबाहेर निघून गेला होता. यानंतर वडील कानिफनाथ पवार यांनी रात्री उशिरापर्यंत मुलाचा आजूबाजूला शोध घेतला. मात्र तो मिळून आला नाही.
यानंतर वउील पुन्हा पहाटेच्या सुमारास मुलाचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडले. यावेळी वडील कानिफनाथ यांना मुलाने नविन कोर्टरोड व म्हाडा कॉलनीच्या बाजूला असेलेल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे पाहिले. त्यामुळे वडीलांना हा धक्का सहन झाला नसावा, म्हणून त्यांनी मुलाचा मृतदेह खाली घेतला. यानंतर मुलाने ज्या मॅटच्या कपड्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती त्याच मॅटच्या कपड्याने वडीलाने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
पोलिस उपनिरिक्षक शिवाजी कदम व पोलिस कॉन्स्टेबल सचिन देवडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पुढील तपास पोलिस निरिक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलिस करत आहेत.



Comments