जालिंदरनाथ संस्थानवरील दानपेटी चोरीचा तपास थंडबस्त्यात! नाथभक्तांसह रायमोहा ग्रामस्थ संतप्त; पोलिसांची ‘तपास सुरू’ची नेहमीचीच बतावणी
- Navnath Yewale
- 20 hours ago
- 2 min read

बीड : जिल्ह्यात नऊनाथांपैकी मच्छिंद्रनाथ (सावरगाव घाट, ता. आष्टी) व जालिंदरनाथ (येवलवाडी, ता. शिरुर का.) यांचे संजिवनी समाधीस्थळ आहेत. नाथभक्तांचे अद्यस्थान असलेल्या येवलवाडी येथील जाज्वल्य जालिंदरनाथ संस्थानमधील दानपेट्या दत्तजयंतीच्या पूर्वरात्री अज्ञात चोरट्यांनी पळवून त्यातील मौल्यवान सोने, चांदीच्या दागिण्यांसह रोकड लंपास केली. अज्ञात चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये प्रत्यक्ष कृतीकरताना दिसून येत आहेत. पाटोदा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असला तरी महिना उलटूनही अद्याप तपास थंड बस्त्यात असल्याने नाथभक्तांसह रायमोहा ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.
बीडच्या येवलवाडी येथील जालिंदरनाथ संस्थानमध्ये दि. 3 डिसेंबर 2025 रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दानपेट्या पळवून संस्थान पासून काही अंतरावर फेकल्या. मास्क बांधून आलेले अज्ञात तीन चोरटे संस्थानच्या सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये कैद झाले आहेत. चोरट्यांची कृती फुटेमधून दिसून येत आली आहे. संस्थान परिसरात दान पेट्या पळवून त्यातील सोने, चांदीचे दागिण्यांसह रोक रक्कम असा एकून जवळपास 50 लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. सकाळी मंदिर पुजार्याच्या ही बाब लक्षात आल्याने पाटोदा पोलिसांना माहिती देण्यात आली. पाटोदा पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
जालिंदरनाथ संस्थानमधील धाडशी चोरीला महिन्याचा कालावधी लोटला असला तरी पाटोदा पोलिसांना अद्याप चोरट्यांचा सुगाव लागला नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ठरलेली बतावणी ‘तपास सुरू आहे ’ पोलिसांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे तमाम नाथ भक्तांसह रायमोहा ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील गर्भगिरीच्या पर्वतरांगेमध्ये मच्छिंद्रनाथ, गहिनीनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथांची जाज्वल्य देवस्थानं आहेत. राज्यसह देशभरातून नाथभक्त जालिंदरनाथांच्या चरणी लिन होण्यासाठी येतात. नाथभक्तांच्या गर्दीमुळे बारामही जालिंदरनाथ संस्थानला यात्रेचे स्वरुप आलेले असते. संस्थानवर वर्षातून दोन वेळा मोठी यात्र भरते, हरिनाम साप्ताहासह नाथपरंपरांचे उत्सवाचे कायम आयोजन असते. त्यामुळे नाथभक्त वारीत लिन होण्यासाठी जालिंदरनाथ संस्थानला भेटी देतात. श्री क्षेत्र नगदनारायणगड- श्रीक्षेत्र गहिनिनाथगड - श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथगड ( सावरगाव घाट)- श्रीक्षेत्र कानिफनाथगड (मढी, ता. पाथर्डी) या गडांच्या ऐन मध्यभागी असलेल्या जालिंदरनाथ संस्थानवर दररोज भक्तांची यात्रा भरते.
कायम भक्तांनी गजबजलेल्या जालिंदरनाथ संस्थानमधील दान पेट्या गुरूदत्त जयंतीच्या पूर्वरात्री अज्ञात चोरट्यांनी पळवून त्यातील मौल्यवान सोने, चांदीचे दागिण्यांसह रोक रक्कम लंपास केल्याने नाथभक्तांसह ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली. पाटोदा पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल असला तरी, चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेज असतानाही महिनभरापासून पोलिसांना चोरट्यांचा साधा सुगावा लागलेला नाही. दरम्यान, तपासाबाबत पोलिसांकडे विचारणा केली असता सहाय्यक पोलिस निरिक्षक तागड तपास सुरू असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास तत्काळ स्थानिक गुन्हे अन्वेशन अथवा थेट सीआयडी मार्फत करण्यात यावा अशी मागणी नाथभक्त रायमोहा ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. अन्यथा राजूनी -चिंचपुर मार्गावर रास्ता रोकोचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.



Comments