top of page

जीआर करा, अन्यथा आम्ही मुंबई, ठाणे, पुणे जाम करू- वडेट्टीवार

नागपूरमध्ये ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा, हैदराबाद गॅझेटिअरचा जीआर रद्द करण्याची मागणी

ree

नागपूर: मराठा आरक्षण हैदराबाद गॅझेटिअरच्या जीआर विरोधात ओबीसी नेत्यांनी ओबीसी नेत्यांनी विरोधाचा हाबुक ठोकला आहे. कालच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांची भेट घेवून बंद दाराआड चर्चा केली. काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज नागपूरमध्ये संविधान चौकात सकल ओबीसींचा मोर्चा काढण्यात आला.


मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमापत्र देण्यात यावे, मराठावाड्यातील मराठा हा कुणबी आहे. मराठा समाजास ओबीसीतून कुणबी म्हणून आरक्षण मिळावे. दोन वर्षापूर्वी अशी ठाम भूमिका घेलेले आमदार विजय वडेट्टीवार मराठा आरक्षणा विरोधात मैदानात उतरले आहेत. आज विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर येथे ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री महादेव जानकर,मनोहर धोंडे, लक्ष्मण हाके, मंगेश ससाणे, मंगलताई मोराळे यांच्यासह ओबीसी संघटना पदाधिकारी उपस्थित होते. सरकारने मराठा आरक्षणाचा जिआर काढून ओबीसीचा गळ्यावरून सुरी फिरवली आहे. आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही, मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलेलं आहे. त्यांनी आमच्या ताटातलं घेऊ नये. आताच एमपीएससीचा कटऑफ पहा. तुमचा डिएनए जर ओबीसी आहे तर ओबीसींचा घात का केला. सरकार जरांगेच्या दबावापुढे कंबरेपासून खाली झुकलं आहे.


मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर त्वरीत रद्द करा, आता ओबीसी हटणार नाही. जीआर मागे घेतला नाही तर मुंबई, ठाणेसह पुणे जाम करू असा इशारा ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला दिलाय. राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. सरकारने काढलेल्या जीआरविरोधात ओबीसी नेते आक्रमक झाले आहे. आज नागपूरात ओबीसी समाजाकडून मोर्चा काढण्यात आला. यावेळी काँग्रेस नेते आणि ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला गंभीर इशारा दिला.


सरकारनं जीआर काढून ओबीसीवर सुरी चालवलीय आहे. तुम्ही जशी मुंबई जाम केली तशी आणि मुंबईसह ठाणे, पुणे जाम करू. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षणात घुसखोरी केली जातेय. ओबीसीच्या मानेवर सुरी चालवण्याचे काम सरकारनं केलं आहे. 374 जातींनी तुम्हाला खुर्चीवर बसवलं त्यांच्यावरच अन्याय करण्याची हिंमत कशी झाली असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला.


वडेट्टीवार यांचे भाषण सुरु असताना...

नागपूरच्या संविधान चौकात मोर्चास वडेट्टीवार संबोधीत केले, वडेट्टीवार यांचे भाषण सुरू असतानाच लोकांनी काढता पाय घेतला. यावेळी वडेट्टीवार यांनी जरा थांबा हा जीआर आपल्या मुळावर आला आहे असे सांगत आवाहन केले. मात्र गर्दीतून मार्ग काढत लोक बाहेर पडू लागले.

Recent Posts

See All
स्वबळाचा नारा काँग्रेसचा ! फायदा मात्र भाजपाचा !!

मुंबई महापालिका निवडणूका काँग्रेस स्वबळावर लढणार! असा नारा भाई जगताप यांनी दिला आणि मुंबईचे राजकारण पुन्हा एकदा तापू लागले. मतदार यादीत घोळ झाला असा आरोप करीत भाजपा विरोधकांनी एकजुटीने आक्रमक भूमिका

 
 
 

Comments


bottom of page