top of page

ज्यांचे भले केले, तेच माझ्यावर उलटले, महिलांशी केलेली कृती विधीचाच भाग अशोक खरातचा पोलिस कस्टडीत अजब दावा

नाशिक : अंधश्रद्धेचा बाजार मांडून अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणार्‍या स्वयंघोषित ज्योतिषी विकृत अशोक खरातच याला मा. न्यायालयाने 29 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सध्या अशोक खरातची एसआयटीकडून कसून चौकशी सुरू असून विविध धक्कादायक माहिती समोर येत आहे. याचदरम्यान आता एसआयटीच्या तपासात अशोक खरात स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे.


अशोक खरातने एसआयटीच्या तपासादरम्यान एक अजब दावा केला आहे. “ माझ्या अंतरमनाने मला धोका दिला.मी ज्यांचे भले कले तेच माझ्यावर उलटले, असं अशोक खरात तपासात म्हणाला. तसेच महिलांसोबत केलेली कृती हा विधीचाच एक भाग असल्याचा खळबळजनक दावा अशोक खरातने केला आहे. मी कुणावरही जबरदस्ती केलेली नाही, असंही अशोक खरात चौकशीदरम्यान म्हणाला. अशोक खरातचा पोलीस कोठडीत देखील मंत्रजप सुरु असल्याचं समोर आलं आहे.


संस्थानचे बँक अकाऊंट सील:

अशोक खरातच्या शिवानिका संस्थांचे बँक अकाऊंट सील करण्यात आले आहे. विशेष तपरास पथकाकडून मालमत्तेची माहिती मागवली असून अशोक खरातच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या जमीन, घर, दुकानांची चौकशी सुरु आहे. नोंदणी विभागाकडून राज्यभरातील मालमत्तेचा शोध सुरू आहे. कोट्यावधी रुपयांची आर्थिक माया अघड होण्याची शक्यता आहे. मालमत्ता खरेदीसाठी पैसा कुठून आला, याचा तपास केला जाणार आहे. पुढील 2-3 दिवसांत तपासाला वेग येणार आहे.


शस्त्र परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू:

अशोक खरतकडून जप्त बंदुकीचा परवाना नाशिक जिल्हा प्रशासनानेच दिल्याचे उघड झाले आहे. 15 ऑक्टोबर 2012 रोज शस्त्र परवाना मंजूर झाला होता. 1 जानेवारी 2024 रोजी परवान्याचे नूतनीकरण झाल्याची नोंद आहे. चौकशीत अशो कखरातच्या फार्महाऊसवरून 21 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. त्यापैकी 5 काडतुसे वापरलेली, वापर कशासाठी केला याचा तपास सुरू आहे. राज्यभर गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत आहेत. गेल्या सात दिवसांच्या तपासात शस्त्र बाळगल्याची माहिती समोर आली आहे. काडतुसांचा वापर नेमका कुठे झाला? तपास यंत्रणांचा शोध सुरू आहे. शस्त्र परवान्यासाठी खरातने जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केला होता. जिल्हाधिकार्‍यांच्या परवानगीनंतरच शस्त्र परवाना देण्यात आल्याची माहिती आहे. आता बंदुकीचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Comments


bottom of page