ट्रम्पचा व्हिसा बॉम्ब; एच 1 बी व्हिसा् ,भारतीयांना मोजावे लागणार 88 लाख रुपये
- Navnath Yewale
- Sep 20
- 1 min read

अमेरिकेने एच 1 बी व्हिसाच्या फिमध्ये मोठी वाढ केली असून ती थेट 88 लाख रुपये इतकी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे लाखो भारतीय आयटी प्रोफेशनल्स आणि विद्यार्थ्यांच्या करिअरवर गंभीर परिणाम होणार आहे.
अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच- 1 बी व्हिासाच्या शुल्कात प्रचंड वाढ जाहिर केली आहे. याआधी साधारण 1 ते 6 लाख रुपये असणारी फी आता थेट 88 लाख रुपये (100,000 डॉलर्स) इतकी करण्यात आली आहे. या निर्णयाचा परिणाम थेट भारतातील 2 लाखांहून अधिक आयटी व्यवसायिकांवर होणार आहे. विशेष: अमेरिकेत काम करणार्या आणि शिक्षण घेणार्या भारतीयांवर याचा मोठा आर्थिक व करिअरविषयक परिणाम होऊ शकतो.
हा एक नॉन-इंमिग्रंट व्हिसा असून तो लॉटरी प्रणालीद्वारे दिला जातो. याची कालावधी तीन वर्षे असते आणि दरवर्षी शुल्क भरावे लागते. शुल्कवाढ झाल्यानंतर भारतीय अविद्यार्थी, आयटी प्रोफेशनल्स व स्टार्ट-अपमध्ये काम करणार्यांना मोठा फटका बसणार आहे.
ट्रम्पच्या निर्ययाचे 10 मोठे परिणाम
दोन लाखांपेक्षा अधिक भारतीयांवर थेट परिणाम होऊ शकतो, अमेरिकन आयटी कंपन्यांमध्ये कार्यरत भारतीय कर्मचार्यांवर विशेष फटका, अमेरिकेत नव्या नोकर्यांच्या संधी कमी होऊ शकतात., अमेरिकन विद्यापीठांत मास्टर्स वा पीएचडी करणार्या विद्यार्थ्यांवर परिणाम, शिक्षण पूर्ण केल्यानंतर अमेरिकेत नोकरी मिळवण्याचे मार्ग मर्यादित होतील, कारण प्राधान्य अमेरिकन नागरिकांना दिले जाईल, भारतीय विद्यार्थ्यांवर व कुटुंबावर मोठा आर्थिक ताण, अमेरिकेत करिअरची सुरुवात करणार्या तरुणांना अडचणी येतील, एसटीईएम क्षेत्रातील ( सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनियरिंग, मॅथ्स) भारतीयांना सर्वाधिक फटका बसू शकतो.
भारत अमेरिका संबंधावर परिणाम
तज्ज्ञांच्या मते हा निर्णय फक्त भारतीयांसाठी नाही तर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक ठरू शकतो. कारण आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भारतीय कामगारांवर अमेरिकेच्या कंपन्या अवलंबून आहेत. भारत सरकार या निर्णयावर कडक भूमिका घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


Comments