top of page

ट्रेड वॉर; चीन भारतासाठी उदार, भारतात इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार


ree


अमेरिकेने 125 टक्के टेरिफ लावताच चीनने भारताला गोंजारायला सुरुवात केली आहे. लाडाखवरून चिन भारताला गेल्या काही वर्षापासून त्रास देत आहे. अरुणाचल प्रदेशपासून ते लडाखपर्यंत चीन भारतीलय भूभागावर अतिक्रमण करत आहे. तसेचे सीमेवर शस्त्रास्त्रांचा साठा करू लागला आहे. परुतू अमेरिकेने ट्रेड वॉर सुरु केल्यानंतर लगेचच चीनने भारताला येरे माझ्या सोन्या, करत गोंजारायला सुरुवात केली आहे.


राजा उदार झाला आणि दान भोपळा दिला या म्हणी प्रमाणे चीनने भारतासोबत केले आहे. ट्रेड वॉर सुरु होताच आता चीनच्या कंपन्या तळमळू लागल्या आहेत. चिनी इलेक्ट्रॉनिक कंपोनंट कंपन्यांनी भारतीय कंपन्यांना पार्ट घेतले तर लगेचच 5 टक्के सूट देऊ केली आहे. आता भारतीय कंपन्या देखील ही संधी उचलण्याची शक्यता आहे.


यामुळे येत्या काळात हा मिळत असलेला डिस्काऊंड बाजारात वस्तुंची मागणी वाढविण्यासाठी या कंपन्या ग्राहकांना देखील देण्याची शक्यता आहे. असे झाले तर भारतात टीव्ही, फ्रिज, स्मार्टफोन यासह आदी इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होऊ शकतात. ईटीने याबाबतचे वृत्त दिले आहे.


अमेरिकेत चीनमधून येणार्‍या वस्तू महागणार आहेत. जवळपास याची किंमत दुप्पट होणार आहे. यामुळे मागणी कोसळणार आहे. मागणी कमी होणार असल्याने चिनी कंपोनंट बनविणार्‍या कंपन्यांची झोप उडाली आहे. यामुळे या कंपन्या भारतीय कंपन्यांना डिस्काऊंट देऊ लागल्या आहेत. चीनवर 125 टक्क टेरिफ लावल्याने 100 डॉलरची वस्तु आता अमेरिकेत 225 डॉलर्सला मिळणार आहे.



ट्रम्प यांनी चीन सोडून अन्य देशांवर टेरिफ लावण्याचे 90 दिवसांसाठी रोखले आहे. चीनने जागतिक बाजारासाठी सन्मान दाखविला नाही. यामुळे त्यांच्यावर मी टेरिफ वाढवून 125 टक्के करत आहे. अमेरिका आणि इतर देशांना लुटण्याचे दिवस गेले आहेत, हे लवकरच समजेल असे आपल्याला वाटत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

Comments


bottom of page