ठाकरे बंधूंचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप प्रचारानंतर मतदारांच्या गाठीभेटीवर आक्षेप; तीन प्रश्नांचे कोडे मुळात ही मुभा मिळाली का?, दिली का?, हा कायदा बदलला का?
- Navnath Yewale
- 10 hours ago
- 2 min read

मुंबई: राज्यात 29 महानगरपालिका निवडणूकीच्या मतदानासाठी अवघे काही तास उरले आहेत. काल सायंकाळी 5:00 जाहिर प्रचार थंडावला असला तरी निवडणूक अयोगाने अटी व शर्थी घालून उमेदवारांना प्रचार संपल्यानंतर मतदारांच्या गाठीभेटीची परवानगी दिली आहे. शिवाय मतदान प्रक्रियेमध्ये आता ईव्हिएम सोबतच ‘पाडू’ यूनिट मशिन कार्यान्वीत केली आहे. निवडणूक अयोगाच्या या निर्णया विरोधात संताप व्यक्त करत आज राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी तातडीच्या पत्रकार परिषदेतून निवडणूक अयोगावार गंभीर आरोपक केले.
महापालिका मतदान प्रक्रियेला अवघे काही तास शिल्लक असताना ठाकरे बंधूंनी निवडणूक अयोगावर गंभीर आरोप केले आहेत. निवडणूक प्रचारात विविध पक्षाचे कार्यकर्ते पैसे वाटतानाच्या रिल्स व्हायरल होत आहेत. काही ठिकाणी मारहाणीस, हल्ल्याचे प्रकारही घडले आहेत. काल प्रचार तोफा थंडावल्यानंतर निवडणूक अयोगाने पत्रकार परिषदेतून आदर्श आचारसंहितेमधील काही बदल सूचवले. जाहिर प्रचार संपल्यानंतर कुठलेही पॉम्पलेट ने देता उमेदवारांना केवळ मतदारांच्या गठीभेटीची मुभा देण्यात आली. शिवाय तांत्रीक अडचण दूर करण्यासाठी मतदान प्रक्रियेच्या ईव्हिएम यंत्राशी ‘पाडू’ नवाची नविन युनिट मशिन जोडली जाणार असल्याचंही नमूद करण्यात आलं निवडणूक आयोगाचे आयुक्त वाघमारे यांनी याबाबत सूचना दिल्या.
निवडणूक अयोगाच्या या निर्णया विरोधात संताप व्यक्त करत राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी निवडणूक अयोगावर सरकारला मदतीचे गंभीर आरोप केले. आज तातडीच्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे बोलत होते. राज ठाकरे म्हणाले की, निवडणूक आयोग कोणासाठी काम करतंय, नविन नियमा नुसार मतदनाच्या आदल्या दिवशी सायंकाळी 5:00 पर्यंत उमेदवार मतदरांना भेटू शकतात. आज अचानक नविन प्रथा, नविन पद्धत कशी आणि कोठून आली. यापूर्वी विधानसभा, लोकसभा निवडणूकांमध्ये किंवा इतर कुठल्याच निवडणूकांमध्ये का नव्हती. तुम्ही मतदारांना भेटू शकता पण पत्रकं वाटू शकत नाहीत, पण पैसे वाटू शकता कदाचित असं म्हणायचं असेल आयुक्त वाघामारे असा उपसाहत्मक प्रश्नही त्यांनी केला. यावेळी त्यांनी अयोगाकडे बोट दाखवत तीन प्रश्न मांडले. ते म्हणाले मुळात ही मुभा मिळाली का?, दिली का?, हा कायदा बदलला का? नव्याने या सगळ्या गोष्टी आणल्या जातायत त्या कशासाठी.?
निवडणुक अयोगाने आता नव्याने ‘पाडू’ (प्रिंटींग अब्झूलरी डिस्प्ले युनिट) ईव्हिएम सोबत जोडलं आहे. हे कोणत्या राजकीय पक्षाला सांगितलेलं नाही. कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलेलं नाही. हे कळल्या नंतर उद्धव ठाकरे यांनी आयोगाला पत्र दिलं आहे. ज्यामध्ये त्यांनी ईव्हिएम मशीनला हे मशीन लावणार आहात ते तुम्ही सांगितलं नाही काय प्रकार आहे हा. निवडणूक आयोग जे हवंय ते करतयं, आयुक्त वाघमारे यावर उत्तर द्यायला तयार नाहीत. आत्ताच्या सरकारने वाघ कधीच मारून टाकलाय. त्यांच्याकडून काही अपेक्षा नाही असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये ही कोणती प्रथा, आणि कोणत्या गोष्टी चालू आहेत. निवडणुकीच्या तोंडावर रोजच्या रोज हे कायदे बदलतायत हा काय प्रकार आहे. सरकारला ती गोष्ट हवी आहे ती गोष्ट करून देण्यासाठी निवडणूक अयोग आहे का? त्यांच्या सुविधांसाठी आता निवडणूक अयोग काम करतंय का? असा हा सध्याचा प्रश्न आहे. हरलेली गोष्ट जिंकून देण्यासाठी निवडणूक अयोग सरकारला मदत करतोय असा आमचा आरोप आहे.
कुठल्याच राजकीय पक्षाला विचारात घ्यायचं नाही, सांगायचं नाही आणि नविन मशीन ईव्हिएम मशीनला जोडायची.वाटेल तसा कायदा बदलायचा मतदानात गडबड होणार नाही याची गॅरंटी कोणी घ्यायची असा प्रतिप्रश्नही राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.



Comments