डॉक्टला मृत्यूस कारणीभूत ठरवत पित्यासह नातेवाईकांचा हॉस्पीटलसमोर आंदोलनाचा इशारा!
- Navnath Yewale
- Dec 6, 2025
- 1 min read

बीड: शहरातील गुरुदत्त हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आलेल्या कु.संस्कृती बारगजे हिचा दि.3 डिसेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉक्टरच्या निश्क्रियतेमुळे सुविधांअभावी वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने संस्कृतीचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. निश्क्रिय डॉक्टर व त्यांची पाठराखण करणार्यांवर कठोर करावाईच्या मागणीसाठी मयत कु. संस्कृतीचे पिता संजय बारगजे यांनी हॉस्पीटलसमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे.
तालुक्यातील पिंपळनेर येथील 7 वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या संस्कृतीस श्वसनाचा त्रास होवू लागल्याने दि.1 डिसेंबर रोजी शिरुर शहरातील गुरुदत्त हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल केले होते. हॉस्पटीलमध्ये उपचार सुरू असताना कु. संस्कृती हिचा दि.3 डिसेंबर रोजी मृत्यू झाला. दरम्यान, सबंधीत डॉक्टरचा हालगर्जीपणा, निश्क्रियतेमुळे संस्कृतीवर वेळेत योग्य उपचार झाले नाहीत त्यामुळेच तिचा जीव गेल्याचाा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
संस्कृतीच्या मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल अद्याप मिळाला नसल्याचा आरोपही संस्कृतीचे पिता संजय बारगजे यांनी निवेदनाद्वारे केला आहे. संस्कृतीच्या मृत्यूस महिना लोटला असला तरी अद्याप तक्रारीची दखल घेवून जबादार डॉक्टर व त्यांची पाठराखण करणार्यांवर कारवाईस दिरंगाई करण्यात येत असल्याचे निवेदनामध्ये नमूतद करण्यात आले आहे. न्यायासाठी महिन्याभरापासून प्रशासनाचे उंबरे झिवूनही जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हापरिषद बीड, जिल्हा शल्य चिकित्सक बीड, पोलिस अधिक्षक कार्यालय, पोलिस निरिक्षक पोलिस ठाणे शिरुर कासार कार्यालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत सबंधीत डॉक्टरची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, संस्कृतीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणार्या डॉक्टरवर विश्वास नसल्याने तिच्या मृतदेहाच्या सर्व तपासण्या, रक्त, अन्न यासह उपयुक्त नमुने घेतले असतील तर ते सर्व फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात यावेत, सबंधीत डॉक्टर लिहीत असलेल्या डिग्रीबाबत योग्य ती चौकशी करण्यात यावी,
संस्कृतीवर करण्यात आलेल्या उपचारा दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावेत, संस्कृतीवर उपचार करणार्या हॉस्पीटलच्या सर्व स्टाफचे शैक्षणीक पात्रतांचे कागदपत्र मिळावे सीसीटीव्ही फुटेजनुसार यासह आदी मागण्यांसाठी मयत संस्कृतीचे पिता संजय बारगजे यांनी नातेवाईकांसह दि.8 डिसेंबर पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी, जिल्हाआरोग्य अधिकारी यासह जाबाबदार प्रशासनास दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.



Comments