top of page

डोनाल्ड ट्रम्प भारताला म्हणाले “नरकाचे द्वार” वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टमुळे जगभरात संताप

अमरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर भारत आणि चीनबाबतची एक अत्यंत आक्षेपार्ह विधान रिपोस्ट केले आहे. रेडिओ मायकल सॅव्हेज यांनी एक पत्र शेअर केले होते, ज्यामध्ये त्यांनी भारत आणि चीनचे वर्णन “नकराचे द्वारे” असे केले होते. वांशिक द्वेषपूर्ण विधाने करताना सॅव्हेज यांनी लिहिले की, अमेरिकेने जन्मसिद्ध नागरिकत्वाबाबतच्या आपल्या कायद्यांमध्ये सुधारणा केली पाहिजे.


सॅव्हेज यांनी असा दावा केला की, आशियाई देशांमधील लोक अमेरिकेत येतात आणि अवघ्या नऊ महिन्यांच्या आतच एका बाळाला जन्म देतात. परिणामी ते बाळ जन्मत:च त्वरित अमेरिकेचे नागरिक बनते. त्यांनी असा युक्तिवाद केला की, या कायद्याचा वेगाने गैरवापर केला जात आहे, ज्यामुळे अमेरिकेचे नुकसान होत आहे.


शिवाय, सॅव्हेज यांनी असेही लिहिले की, ते बाळ त्वरित अमेरिकेचे नागरिक बनते आणि त्यानंतर त्याचे कुटुंब चीन, भारत किंवा इतर देशांतून तिथे येऊन दाखल होते. त्यांनी या देशांचे वर्णन पृथ्वीवरील “ नरकाचे द्वारे” असे केले. सॅव्हेज यांचे हेच पत्र डोनाल्ड ट्रम्प यांनी शेअर केले आहे. ट्रम्प यांनी ही टिप्पणी शेअर करण्याचा निर्णय, त्यांनी स्वत:च महागाई आणि जन्मसिद्ध नागरिकत्वाबाबत काही वादग्रस्त दावे केल्यानंतर अवघ्या एका दिवसानंतर घेतला आहे.


सॅव्हेज यांनी स्थलांतरितांना “ लॅपटॉपधारी गुंड” म्हटले आहे आणि असा दावा केला की, या व्यक्तींनी अमेरिकन ध्वजाचा अपमाण केला आहे. सॅव्हेज यांच्या मते, या आशियाई देशांमधून आलेल्या स्थलांतरितांनी अमेरिकेचे नुकसान हे सर्व माफिया कुटुंबांनी मिळून केलेल्या नुकसानापेक्षाही अधिक केले आहे. तसेच ते अमेरिकन नागरिकांना दुय्यम दर्जाचे नागरिक मानतात. त्यांनी असाही दावा केला की, कॅलिफोर्नियातील उच्च-तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये आता गोर्‍या पुरुषांसाठी नोकर्‍याच उरल्या नाहीत, कारण तिथली संपूर्ण व्यवस्था आता भारतीय आणि चिनी नागरिकांच्या ताब्यात गेली आहे.


अमेरिकेचे संविधान स्वत:च जन्मसिद्ध नागरिकत्वाचा अधिकार प्रदान करते. ट्रम्प यांचे हे विधान अशा वेळी समोर आले आहे, जेव्हा ते स्वत:च अमेरिकन संविधानातील 14 व्या घटनादुरुस्तीला आव्हान देत आहेत. हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की, नेमकी हीच घटनादुरुस्ती जन्मसिद्ध नागरिकत्वाची हमी देते. अलिकडेच, ट्रम्प यांनी असा दावा केला होता की, अमेरिका वगळता जगातील इतर कोणताही देश जन्मसिद्ध नागरिकत्व देत नाही. पण वस्तुस्थिती अशी आहे की , हा कायदा सध्या जगभरातील सुमारे 36 देशांमध्ये लागू आहे, ज्यामध्ये कॅनडा, मेक्सिको आणि ब्राझील या देशांचा समावेश आहे.


ट्रम्प यांची भारतविरोधी भाषा?

ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आपले संबंध चांगले असल्याचे सातत्याने सांगितले असले, तरी त्यांच्या दुसर्‍या कार्यकाळात ते वारंवार भारतविरोधी विधाने करताना दिसून आले आहेत. व्यापारी करारांबाबतची त्यांची भूमिकाही विशेषत: कठोर दिसून आली. शिवाय इराणसोबतच्या संघर्षामध्ये पाकिस्तानच्या सहयोगाने अमेरिकेने शस्त्रसंधी घडवून आणण्याचे प्रयत्न केले, पण या संपूर्ण राजनैतिक प्रक्रियेत भारताचा समावेश करण्यात आला नव्हता.

Comments


bottom of page