top of page

...तर 1994 चा जीआर सुद्धा न्यायालयीन प्रक्रियेने रद्द करू - जरांगे पाटील

ree

तुम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात जाणार असाल तर आम्ही 1994 च्या जीआरनुसार घुसखोरी केलेल्या 16 टक्के वाल्यांच्या विरोधात आम्ही कोर्टात जाऊ असा इशारात देत जरांगे पाटील यांनी खळबळ उडवून दिली आहे.


मराठा समाजास ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर पाच दिवस आंदोलन केले. जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत सकराने हैदराबाद गॅझेटचा जीआर काढला. त्यानंतर ओबीसी नेत्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली.


एकीकडे मराठा समाजास ओबीसीतून आरक्षणाचा मार्ग मोकळा झला तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांनी सरकारच्या जीआर विरोधात थेट कोर्टात जाण्याची घोषणा केली. त्याच बरोबर मराठा आरक्षणाच्या विरोधात न्यायालयासह रस्त्यावरची लढाई लढण्याच्या घोषणा करण्यात आल्या.


प्रत्यक्षात सरकारने काढलेल्या जीआरचा ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नसल्याचे जाहिर करत नागपूर येथे सुरू असलेले राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आंदोलन स्थागित करण्यात आले. महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी सरकारच्या जीआरमुळे नुकसान होत नसल्याचे सांगत ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र दिलं जाणार असल्याचे अश्वासन ओबीसी कल्याण मंडळाचे अध्यक्ष तथा मंत्री अतुल सावे यांनी आंदोलकांना दिले. शिवाय आंदोलकांच्या 14 पैकी 12 मागण्या मान्य केल्या. त्यामुळे महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी आंदोलन स्थगितीची घोषणा केली.


त्यांनतर काल नागपूरमध्ये विदर्भातील ओबीसी नेत्यांनी सरकारच्या जीआर विरोधात बैठक बोलावली. सरकारने काढलेला जीआर तत्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी आगामी काळात ओबीसींच्या महामोर्चाची घोषणा केली. दरम्यान, सरकारच्या जीआरलाची खासकरुन मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांत होळी करण्यात आली.


नेत्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे मराठवाड्यातील समाजिक दरी वाढत चालल्याचे चित्र आहे. कालच बीड जिल्ह्यात त्याचा प्रत्यय दिसून आला. भोलवाडी येथे मनोज जरांगे पाटील यांचे बॅनर हटवण्यावरून दोन गटात राडा झाला. सायंकाळी ओबीसींचे बॅनर हटवल्या नंतर सकाळी जरांगे पाटील यांचे बॅनर हटवण्यात आले. धारुर तालुक्यातील भोगलवाडी येथील दोन गटातील वादामुळे पोलिसात एका गटाविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


दरम्यान, मराठा समाजास आरक्षण कुणबी प्रमाणपत्र देणार्‍या सरकारच्या जीआर विरोधात कोर्टात जाणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी जाहिर करताच आज मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संंभाजी नगर येथील गॅलेक्सी हॉस्पीटलमधून पत्रकार परिषद घेत मंत्री भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला. मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टात गेलात तर आम्ही ही सन 1994 चा जीआर न्यायालयीन लढाईने रद्द करून दाखवू. 1994 च्या जीआर नुसार घुसखोरी केलेल्या 16 टक्के वाल्यांच्या विरोधात कोर्टात जाऊन तो जीआर रद्द करून दाखवू असा इशारा पाटील यांनी दिला.


आमदार धनंजय मुंडे यांनी नुकतेच जिल्ह्यातील समाजीक ऐक्यावर भाष्य करत ‘मधल्या काळात सामाजिक ऐक्य विखुरलं गेलं, लाज वाटते सांगताना बीड मधील पोलिस बांधव आपलं आडनावा लावू शकत नसतील तर जिल्ह्यात कोणतं सामाजिक ऐक्य राहिलं’ असं वक्तव्य केलं. त्यावर जरांगे पाटील म्हणाले मराठ्यांच्या नादी लागायचं नाही. आम्ही जातीवादी नाहीत आम्ही कधीच इतरांना देताना विरोध केला नाही. पण यापुढे मराठ्यांच्या नादी कोणीही लागू नये.

Comments


bottom of page