top of page

... तर अजित पवारांचा पक्ष संपेल - जरांगे पाटील

ree


आमदार धनंजय मुंडे यांना आता पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं जाणार नाही. जर तसं झालं तर अजित पवार यांचा पक्षच शिल्लक राहणार नाही असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. सांगली येथे पत्रकारांशी बोलताना जरांगे पाटील यांनी धनंजय मुंंडे यांच्यावर हल्लाबोल केला.


बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्ते नंतर धनंजय मुंडे यांच्या जवळचे वाल्मीक कराड यांचा हत्तेत सहभाग समोर आला. त्यामुळे धनंजय मुंडे यांना कृषीमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्याबरोबरच कृषी विभागातील टेंडर प्रक्रियेतील अनियमिततेचे आरोपही धनंजय मुंडे यांच्या वर करण्यात आले होते. दरम्यान, मा. उच्च न्यायालयाकडून धनंजय मुंडे यांना कृषी घोटाळ्यात क्लिन चिट मिळाली. त्यामुळे विरोधकांनी संताप व्यक्त करत या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात दाद माण्याचाही दावा केला.


धनंजय मुंडे यांना कृषी घोटाळ्यात मा. न्यायालयाकडून क्लिनचिट मिळाली आहे. आणखी एक दोन प्रकरणांची चौकशी सुरू आहे, जर त्याही प्रकरणात धनंजय मुंडे यांना आशीच क्लिन चिट मिळाली तर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देऊ शकतो असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं होतं. अजित पवार यांच्या भुमिकेवरही विरोधकांनी टीकेची राळ उठवली.


मागील पंधरवाड्यामध्ये आमदार धनंजय मुंडे यांनी ठाणे येथे आयोजित वंजारी समाज मेळाव्यामध्ये विरोधकांना फैलावर घेत ‘वैर माझ्याशी होते, माझ्या मातीची बदनामी का?’ असे म्हणत शेरोशायरीत विरोधकांचा समाचार घेतला.

200 दिवस गप्प राहिल्याचे कारण सांगत त्यांनी या कालावधीतला संघर्ष उपस्थितांसमोर मांडला.


संतोष देशमुख यांच्या हत्तेप्रकरणी न्यायप्रक्रिया सुरू आहे तर दूसरीकडे 21 महिन्यापूर्वी झालेल्या महादेव मुंडे यांच्या क्रूर हत्ते प्रकरणाचा तपास एसआयटी मार्फत सुरू आहे. सामाजिक कार्यकर्ते बाळा बांगर यांच्यासह भाजप आमदार सुरेश धस यांनी महादेव मुंडे यांच्या हत्ते प्रकरणातही वाल्मीक कराड व त्याच्या गँगचा सहभाग असल्याचा दावा केला आहे. त्यातच धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच वक्तव्याचा आता जरांगे पाटीलयांनी चांगलाच समाचार घेतला आहे.



सांगली येथे पत्रकारांनी धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाष्यावरू जरांगे पाटील यांना प्रश्न विचारताच पाटील म्हणाले की, ते तुम्ही आता मनातही आणू नका, जर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं तर, अजित पवार यांचा पक्षच संपेल. माणंस मारली आहेत धडधडीत आणि माणसं मारणार्‍यांची साथ देणार्‍यांना मंत्रिमंडळात स्थान म्हटल्यावर जनतेला वेडं समाता काय? असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

Comments


bottom of page