...तर पार्थ पवार यांना कोणीही पाठीशी घालणार नाही, संजय शिरसाठ यांनी त्यांनी केलेल्या घोटाळ्या विषयी बोलावे; जरांगे पाटलांना धमकी गंभीर प्रकरण - आ. रोहित पवार
- Navnath Yewale
- Nov 9
- 1 min read

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचा सहभाग असल्याा आरोप झाला. या प्रकरणी राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी आपली भूमिका आज (दि.9) स्पष्ट केली. माध्यमांशी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, “ पार्थ पवार यांनी चूक केली असेल तर त्यांना पाठीशी घालण्याचे काम कोणीही करणार नाही.
पण याचा प्रकरणी इतकी जलद कारवाई का, आम्ही आजवर अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली आहेत, त्यावर का चौकशी लावली जात नाही, सिडकोचा 5 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे, त्यावर का कारवाई होत नाही, “असे सवाल करत मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या घोटाळ्याच्या संदर्भात बोलावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
नात्यातील व्यक्ती म्हणून आपण एक वेगळी भूमिका संबंधित व्यक्तीबद्दल घेऊ शकतो; पण जेव्हा राजकीय विरोधक म्हणून वेगळी भूमिका घ्यावी लागते. रोहित पवार म्हणाले की, जमीन प्रकरणी सुप्रिया सुळे यांनी भावनिक होऊन भूमिका घेतली असेल; पण नंतर त्यांनी योग्य राजकीय भूमिका घेतली. शरद पवार यांनी राजकीय भूमिका घेतली आहे. आम्ही शरद पवार यांच्या विचाराने काम करणारे लोक आहोत.
संजय शिरसाट यांनी त्यांनी केलेल्या घोटाळ्याच्या संदर्भात आधी बोलावे आणि माझ्या प्रश्नाला उत्तर द्यावे, असे आव्हान रोहित पवारांनी केले. तसेच मराठा आरक्षण आंदोलक मनेाज जरांगे पाटील यांना धमकी मिळत असेल तर गंभीर गोष्ट आहे. पण या प्रकरणात दोन्हीकडून आरेाप आणि प्रत्यारोप होत आहे, याची चौकशी झाली पाहिजे, असंही ते म्हणाले. बाबा सिद्दीकी यांची झालेली हत्या ही एक क्रूर घटना होती. या संदर्भात आत्ता कोर्टात त्यांच्या पत्नीने याचिका दाखल केली आहे. त्यामुळे या याचिकेत ज्या कोणाचे नाव आहेत, त्यांची निष्पक्षपणे चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.



Comments