top of page

तहसीलकार्यालयातील लिपिक एसीबीच्या जाळ्यात

आहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे तहसील कार्यालयातील लिपीकास 13 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. मालमत्तेच्या वाटप पत्राचा आदेश करून देण्यासाठी संबंधित नागरिकाकडे लिपिक कैलास खाडे याने 13 हजार रुपयांची लाच मागितली होती.



मालमत्तेच्या वाटपपत्राचा आदेश करून देण्यासाठी तहसीलकार्यातील लिपिक कैलास खाडे याने तक्रारदाराकडून 13 हजार रुपयाची मागणी केल्याची तक्रार आहिल्यानगर लाचलूचपत प्रतिबंधक विभागास देण्यात आली. प्राप्त तक्रारीची खात्री करुन गुरुवारी (दि.26) पथकाने सापळा रचला. यावळे तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताना लिपिक कैलास खाडे यास रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईमुळे संगमनेर तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. पुढील गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून लाचलूचपत विभागाकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

Comments


bottom of page