top of page

तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडवर, एसपींना पाठवलं पत्र; अहिल्यानगर जिल्ह्यातील बोगस दिव्यांगाची मागवली माहिती

अहिल्यानगर : राज्यातील बोगस दिव्यांग प्रकरणाचा पाठपुरावा दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे आपल्या स्टाईलनुसार घेत आहेत. यात जे बोगस दिव्यांग सापडत आहेत, त्यांच्याविरोधात लिंबनाची आणि फौजदारी कारवाईचा सपाटा लावला आहे. तुकाराम मुंडे यांनी तसे प्रशासकीय पातळीवर आदेश काढलेत आहेत.


याच कारवाईत अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रशासकीय पातळीवर दिरंगाई होत असल्याचं दिसत असल्याने तुकाराम मुंढे यांनी थेट पोलिस अधीक्षकांना पत्र पाठवून दाखल गुन्ह्याची माहिती मागवली आहे. तुकाराम मुंढे यांनी थेट पोलिस अधीक्षकांना पत्र पाठवून दाखल गुन्ह्याची माहिती मागवली आहे. तुकाराम मुंढे यांच्या या हालचालींमुळे अहिल्यानगरमधील प्रशासकीय आणि बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.


अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयाच्या नावाचा वापर करून सरकारच्या अधिकृत पोर्टलवरुन काढण्यात आलेल्या बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या प्रकरणात पोलिसांच्या तपासाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. तुकाराम मुढे यांनी या दिरंगाईची दखल घेतल्याने प्रशासकीय पातीवर धावपळ सुरू झाली आहे.


दिव्यांग कल्याण विभागाने या प्रकरणाशी संबंधित महित्वाची माहिती, विशेषत: प्रमाणपत्रे कोणत्या आयपी अ‍ॅड्रेसवरुन काढण्यात आली, याची सविस्तर माहिती, गतवर्षी मे महिन्यातच पोलिसांना दिली होती. मात्र, इतका काळ लोटूनही पोलिसांनी तपासात कोणतीही ठोस प्रगती केलेली नसल्याने टाळाटाळ होत असल्याच संशय व्यक्त होत आहे.


अहिल्यानगर जिल्ह्यातील दिव्यांग घोटाळ्याबाबत नागपूर अधिवेशनात चर्चा झाली होती. दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी स्वत: अहिल्यानगरच्या पोलिस अधीक्षकांना पत्र लिहून शासकीय पोर्टलवरून जी बोगस प्रमाणपत्र निघाली त्यासंदर्भात 9 सप्टेंबर 2024 रोजी दाखल गुन्ह्याची माहिती मागवली आहे.


दिव्यांग कल्याण विभागचे सचिव तुकाराम मुंढे यांनी, युजर आयडी व पासवर्ड हा जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडेच असतो.त्यामुळे पोलिसांनी जाबाबदारी निश्चित करून कारवाई करायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तुकाराम मुंढे यांच्या या अपेक्षावर, अहिल्यागनर पोलिसांकडून कारवाई सुरू असल्याचे सांगितले जात आहे.


दरम्यान, पोलिस अधीक्ष सोमनाथ घार्गे यांनी सचिव तुकाराम मुंढे यांच्या सूचनेनुसार कारवाई सुरू केली आहे. जिल्हा शल्याचिकित्सक यांची चौेकशी करण्यात आली आहे. पण पासवर्डचा गैरवापर रुग्णालयाबाहेर झाला, असे त्यांचे म्हणणे आहे त्यामुळे आम्ही आयपी अ‍ॅड्रेस मागितला. पण त्यात अचूक मिळाली नसल्याने तपास रखडला आहे, असा दावा करून मोकळे झाले आहेत.

Comments


bottom of page