तुम्हला स्वताच्या पोलिंग एजंटवर भरोसा नाही का ?
- Navnath Yewale
- 7 days ago
- 1 min read
अविनाश महातेकर यांचा हल्लाबोल; निवडणूक आयोगावर आरोप करणाऱ्या विरोधी पक्षाला स्वतःच्या पोलिंग एजंटवर विश्वास नाही का?

मुंबई : सध्या काँग्रेस, शरदचंद्र राष्ट्रवादी, उबाठा शिवसेना, मनसे यांच्याकडून निवडणूक आयोगावर आरोप करून मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याची अफवा समाजामध्ये जाणीवपूर्वक पसरवली जात आहे, मात्र या निवडणूक आयोग आणि त्यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये याच पक्षाचे पोलींग एजंट असतात,बनावट मतदार ते ओळखत असतात, स्वतःच्याच या पुल्लिंग एजंट वरती या विरोधी पक्षाचा विश्वास नाही का? असा गंभीर आरोप आणि हल्लाबोल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवक्ते अविनाश महातेकर यांनी केला आहे.
भारतीय लोकशाही च्या माध्यमातून भारतीय संविधान वर निवडणूक आयोग आपली चोख कामगिरी बजावत आहे, असे असताना निवडणूक आयोगावर आरोप करून नक्की विरोधी पक्षाला काय साध्य करायचे आहे? असा सवारही अविनाश मातेकर यांनी व्यक्त केला आहे.
मागील लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबईमधून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, शिवसेना उबाठाचे अनिल देसाई आणि संजय दिना पाटील हे निवडून आलेत, यावर विरोधी पक्ष आक्षेप का घेत नाही? असे प्रश्नचिन्ह ही महातेकर यांनी केले आहे. निवडणूक आयोगावर आरोप करून मतदारांमध्ये गैरसमज पसरवणे ही बाब अत्यंत गंभीर आहे.
परप्रांतीय हे गेल्या 25 50 वर्षांपूर्वीच मुंबईमध्ये आलेले होते, ही बाब त्या कालच्या शिवसेना सत्ताधारी असताना का लक्षात आलेली नाही, तेव्हाच यावर प्रशासकीय यंत्रणेमार्फत कारभार केला असता तर ही वेळ विरोधी पक्षावर ती आली नसती असा प्रतिसाद ही अविनाश मातेकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.
सध्या मुंबईच्या विकासामध्ये मेट्रो आणि कोस्टल रोडमुळे मुंबईकरांचा प्रवास सुरक्षित आणि वेगवान झाला आहे, त्यामुळे सत्ताधारी शिवसेना-भाजप राष्ट्रवादी रिपाई या महायुतीचा आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस त्यांचे कौतुक होत असताना विरोधी पक्षाने मतदार यादीचा फोटो बनावट रचून समाजामध्ये गैरसमज बसवण्याचे काम करू नये, असेही अविनाश महातेकर म्हणाले



Comments