....तुह्याकडं पैसे नसले तर आमचं वावरं विकू आता नार्कोटेस्टला सामोरं जायचं कुठं लपून बसला आता, समोर ये... जरांगे पाटलांचा धनंजय मुंडेवर घणाघात
- Navnath Yewale
- Nov 12, 2025
- 2 min read

जालना : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येच्या कटा प्रकरणी जालना पोलिसांनी आज पहाटे तिसरा आरोपी कांचन साळवी यास बेड्या ठोकल्या. कांचन साळवी यांनी कालच माध्यमांसमोर खुलासा करत अर्थाचा गैर आर्थ लावण्यात आल्याचे सांगत आपला या घटनेशी संबंध नसल्याचे सांगितले होते. मात्र, पोलिसांनी पहाटे कांचन साळवीला अटक केल्यानंतर जरांगे पाटील यांनी कांचन साळवी आणि आरोपी अमोल खुणे यांच्यातील संवादाची ऑडिओ क्लिपच माध्यमांसमोर ऐकविल्याने प्रकरणाचा गुंता वाढत चालला आहे. आज पत्रकार परिषदेतून जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर घणाघात करत गंभीर आरोप केले आहेत.
जरांगे पाटील हत्येच्या कटाप्रकरणी जालना पोलिसांनी यापूर्वीच अमोल खुणे आणि दादा गरुड यास अटक केली आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांनी आरोपी अमोल खुणे आणि दादा गरुड यांच्यातील संवादाच्या कथित ऑडिओ क्लिपा समाजमाध्यमांवर फिरत आहेत. त्यातच काल कांचन साळवी याने आपला या घटनेशी संबंध नाही. मी केवळ अमोल खुणे यास मित्राचा नातेवाईक म्हणून ओळखतो, कटा बाबत काही माहिती नसल्याचे सांगत. कांचन साळवी यांनी आपल्या बोलण्याचा अर्थाचा गैर आर्थ केल्याचा आरोप केला होता.
दरम्यान, कांचन साळवी याने समाजमाध्यमावर प्रतिक्रिया देताच पहाटे जालना पोलिसांनी कांचन साळवी यास घरातून अटक केले. कांचन साळवी यास अटक करताच जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडेच कटाचा सुत्रधार असून मी नार्कोटेस्ट चा अर्ज दिला आहे. कुठं लपून बसला रे आता खरकट्या, लोकांना काय पुढं घालतो ओबीसींना. तुह्याकडं पैसे नसले तर आम्ही आमचे वावरं विकू तुही फिस भरू कोर्टातली आता याचा छडा लावायचा.
एका .... ची औलाद असल्या सारखं वागायचं. तु तुह्या समाजात सिद्ध हो, मी माझ्या समाजात सिद्ध होतो. तो बीडचा कोण कांचन म्हणला होता माझा या कटाशी संबंध नाही आता त्याची रेकॉर्डिंगच आहे बोललेली. अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांना मी आरक्षणाबाबत बोललो असेल पण या विषयावर बोललो नाही. आता त्याचे लाड बंद करा तुम्हालाही अवघड जाईल.
फडणवीस साहेब या प्रकरणामध्ये ‘दुध चं दुध आणि पाण्याचं पाणी होवू द्या’ असे म्हणत जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर घणाघात केला. शिवाय हे खूप मोठं षडयंत्र आहे. यामध्ये बरेच लोक सहभागी असल्याचा गंभीर आरोपही जरांग पाटील यांनी पत्रकार परिषदे केला.



Comments