top of page

तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट; 51 आमदारांच्या गटाला मंजूरी

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये उभी भूट पडली आहे. टीएमसीतून हकालपट्टी करण्यात आलेले आमदार ऋतब्रत बॅनर्जी यांनी 58 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र विधानसभा अध्यक्षांना सोपवलं आहे. त्यानंतर पश्चिम बंगालच्या विधानसभा अध्यक्षांनी तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर गटाला अधिकृत मंजुरी दिली आहे.


तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. टीएमसीतून हकालपट्टी करण्यात आलेल्या आमदरांनी ऋतब्रज बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड केली आहे. त्यानंतर ऋतब्रत यांनी 58 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र हे विधानसभा अध्यक्षांना दिलं. पक्षांतर बदीं कायद्याच्या माध्यमातून कारवाई होऊ नये, यासाठी 54 आमदारांची गरज होती. आता बंडखोरी करणार्‍या 58 आमदारांचा गट स्थापन झाला आहे.


ऋतब्रत बॅनर्जी यांची पश्चिम बंगालच्या विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता मिळाली आहे. ऋतब्रत बॅनर्जी यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं आहे की, विधानसभा अध्यक्षांनी माझी विरोधी पक्षनेते म्हणून निवडीला मंजुरी दिली आहे. मी आता विधानसभेत विरोधी पक्षाची भूमिका निभावेल’.


नव्या विरोधी गटाचे चार उपनेत्यांची निवड केली आहे. यात जावेद अहमद खान, सबीना यास्मीन, संदीपन साहा आणि सिउली साहा यांच्या नावाचा समावेश आहे. ऋतब्रत बॅनर्जी म्हणाले, ‘ ममता बॅनर्जी आमच्या नेत्या आहेत. त्या आमच्या सल्लागार राहतील. त्या आम्हाला भविष्यातील मार्गदर्शक राहतील. बंडखोर गटात आणखी आमदार सहभागी होतील.’


तृणमूल काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. तृणमूल काँग्रेसने 6 मे 2026 रोजी शोवनदेव चट्टोपाध्याय यांची विरोधी पक्षनेते आणि मुख्य प्रतोद म्हणून शिफारस केली. या प्रस्तावावर अनेक टीएमसी आमदारांच्या सह्या बनावट होत्या. परवानगी न घेता बनावट सह्यांचं पत्र तयार केलं, असा अरोप करण्यात आला. बनावट सह्यांच्या पत्रावरून आमदार ऋतब्रत बॅनर्जी आणि आमदार संदीपन साहा यांनी विधानसभा अध्यक्ष रथींद्र बोस यांच्याकडे तक्रार केली. 6 मे रोजी झालेल्या बैठकीत कोणताही ठराव मंजूर झाला नव्हता. तर प्रस्तावाच्या कागदपत्रांवर 14 आमदारांच्या बनावट सह्या होत्या, अशी तक्रार केल्यानंतर तृणमूल काँग्रेसने ऋतब्रत बॅनर्जी आणि संदीपन साहा यांच्यावर पक्षविरोधी कारवायाच्या अरोपाखाली पक्षातून हाकलपट्टी करण्यात आली.

Comments


bottom of page