तोरंगण घाटात विचित्र अपघात, सुदैवाने जिवीत हानी टळली
- Navnath Yewale
- Sep 11
- 1 min read
एका पाठोपाठ तीन वाहनांचे ब्रेक फेल, ट्रक पलटीसह 100 फूट खोल दरीत कोसळला; वळणांवर सूचना फलकाचा अभाव, उतार कमी करण्याची गरज...

मोखाडा : जव्हार- त्र्यंबकेश्वर राष्ट्रीय महामार्गावरील तोरंगण घाटात दि.११ रोजी एका पाठोपाठ तीन वाहनांचे ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाला,ज्यात एक ट्रक पलटी झाली.
यामुळे घाटाच्या वळणांवर पोचण्याच्या पहिले विशिष्ट अंतरावर योग्य सूचना फलक लावण्याची आणि तीव्र उतार कमी करण्याचा तातडीची गरज करणे गरजेचे आहे.
तोरंगण घाट हा भौगोलिकदृष्ट्या एक कठीण आणि अत्यंत तीव्र उतार असलेला मार्ग आहे.गेल्या काही वर्षांपासून या घाटात अनेक वाहतूक अपघात घडले आहेत,जे प्रामुख्याने ब्रेक फेल होणे,रस्त्याची अवस्था,वळणांची तीव्रता आणि अपुरी सूचना यामुळे होत आहे.गुरुवारच्या या घटनेतही अशीच कारणे दिसून आली.तात्काळ अपघात झाल्यानंतर ट्रक पलटी होऊन १००फूट खाली गेला अपघातातून कोणतीही जीवितहानी झाली नाही,तरीही हा घाट प्रवासी व वाहतूक करणाऱ्यांसाठी अतिशय धोकादायक आहे.
स्थानिक रहिवासी आणि वाहनचालक यांचा असे म्हणणे आहे की, तीव्र वळणांच्या पहिलेच आणि उतारा च्या पहिले स्पष्ट आणि पर्याप्त सूचना फलक लावने गरजेचे आहे. तसेच उतार कमी करण्यासाठी रस्ता सुधारणा करन्यात यावे आणि काही ठिकाणी वाहनांना विश्रांतीसाठी जागा तयार करुन, अपघात झाल्यास त्वरीत मदत मिळू शकेल यासाठी स्थानक सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे असे मत स्थानिक जनतेने व्यक्त केले आहे.
पालघर जिल्हा हा घाट रस्त्यांमुळे खूप मागच्या ठिकाणी गणला जातो आणि वेगवेगळ्या राष्ट्रीय महामार्गांनी येथील वाहतूक घनदाट झाली आहे.पावसाळ्यात तर दरड कोसळण्याचीही भीती राहते ज्यामुळे अपघातांची शक्यता अधिक वाढते.त्यामुळे घाटातील रस्त्यांचे नियोजन व व्यवस्थापन अधिक काटेकोरपणे करणे गरजेचे आहे.
तोरंगण घाटात अपघात कमी करण्यासाठी रस्त्याचे पुनर्रचना करणे,वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आणि आपत्कालीन सेवांचा वेगवान प्रतिसाद होणे आवश्यक आहे,जेणेकरून येणाऱ्या काळात दुर्दैवी अपघात टाळता येतील असे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.



Comments