top of page

... त्या लाडक्या बहिणींसाठी सरकारचा मोठा निर्णयमंत्री आदिती तटकरेंची घोषणा: लाभापासून वंचित लाडक्या बहणींची आंगणवाडी स्तरावर पडताळणी

मुंबई : शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत राज्यातील लाखो महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेअंतर्गत लाडक्या बहीणींना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मतद केली जाते. गावखेड्यातील महिलांना या योजलनेमुळे मोठा फायदा झालेला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाडक्या बहीणींना वेळोवेळी इ-केवायसी करावी लागत आहे. राज्य सरकारने ईकेवायसी करण्यासाठी 31 डिसेंबर ही शेवटची तारीख दिली होती. मात्र आनेक महिलांनी ईकेवायसी करताना यूकीचा पर्याय निवडला होता. त्यामुळे बहूतांश महिलांची ईकेवायशी प्रक्रिया पूर्ण झाली नाही. आता अशा महिलांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे.


राज्याच्या महिला आणि कलकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत ट्टिट करताना अधिकार्‍यांना महत्वाचा आदेश दिला आहे. आदिती तटकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की. “ महराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांच्या आरेाग्य व पोषणामध्ये सुधाराणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थींना दि.31डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, काही कारणास्तव ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निर्दशनास आली आहे. म्हणून योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत.


दरम्यान, मंत्री आदिती तटकरे यांच्या आदेशानुसार आता ज्या लाडक्या बहिणींनी चुकीचा पर्याय निवडला होता त्यांची आता पडताळणी होणार आहे. म्हणजे ती चुकीची माहिती होती त्यात आता दुरुस्ती करता येणार आहे. त्यामुळे चुकीच्या माहितीमुळे या योजनेतून नाम कमी होण्याची शक्यता कमी होणार आहे.

Comments


bottom of page