top of page

थातूर मातुर अहवाल नाही, पुरावा सादर करावा -आमदार मिटकरी


आजितदादांच्या विमान अपघाताची सीआयडी मार्फत चौकशी सुरू आहे. अपघाताबाबतचे अहवाल समोर यायला सुरुवात झाली आहे. युजीसीएने नुकतास प्राथमिक अहवाला सादर केला आहे. लॅडिंगचा अंदाज चुकला, तांत्रिक बिघाड हे अपघाताचे प्रथमिक कारण सांगितले आहे. मात्र राष्ट्रवादीचे (अजित पवार) पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी याबद्दल नाराजी व्यक्त करत “ थातुर मातुर चौकशी अहवाल यायला सुरुवात झाली आहे” असे म्हणत मिटकरींनी पुरावे सादर करण्याची मागणी केली आहे.


बारामती विमानतळावर 28 जानेवारी रोजी लँडिंग दरम्यान झालेल्या विमान अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या विमान अपघाताची सीआयडी मार्फत चौकशी सुरु आहे. त्यानुसार अपघाताचा प्रथमिक अहवाल समोर आला आहे. तांत्रिक बिघाडमुळे हा अपघात झाला नाही, तर त्याला मानवी चुकाही कारणीभूत असल्याचे निरिक्षण या अहवालात नोंदवण्यात आले आहे.


दरम्यान, प्राथमिक अहवालाचे वृत्त समोर आल्यानंतर आमदार आमोल मिटकरी म्हणाले की, “ दादांच्या विमान अपघाताचा थातुर मातुर चौकशी अहवाल यायला सुरूवात झाली आहे. दाद इतकी समान्य व्यक्ती नव्हती, अहवाल सांगेल तांत्रिक चूक होती व वैमानिकाचा अंदाज चुकला व जनता मान्य करेल” महाराष्ट्र पुरावा मागतोय डीजीसीए नी विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज प्रसारित करून दादाच्या आगमनापासून विमानात बसेपर्यंत प्रत्यक्षदर्शी पुरावा सादर करावा अशी मागणीही मिटकरी यांनी केली.

Comments


bottom of page