दहशतवाद विरोधी पथकाच्या मुब्र्यात कारवाई जमाती इस्लामिया संघटनेशी संबंधीत एक शिक्षक ताब्यात
- Navnath Yewale
- Nov 11
- 1 min read

ठाणे: दहशवादी विरोधी पथकाने महाराष्ट्रात कारवाईचा धडाका लावला आहे. काही दिवसांपूर्वी एटीएसने सॉप्टवेअर इंजिनीअरला ताब्यात घेतलं होतं. त्यांनतर आता ठाण्यातील मुंब्रा येथील एका शिक्षकाला ताब्यात घेतलं आहे. जमाती इस्लामिया यासंघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून दहशतवादी विरोधी पथकाने ही कारवाई केल्याची महिती आहे.
दहशतवाद विरोधी पथकाने काही दिवसांपूर्वी पुणे येथे महाराष्ट्र एटीएसने धाड टाकून काही लोकांना अटक केली होती. या आरोपींची विचारपूस केल्यानंतर आरोपींनी मुंब्रामध्ये राहणारा एक शिक्षकाचा संबंध असल्याचं सांगितलं. महाराष्ट्र एटीएसने आज मुंब्रा येथील कवसा विभागामध्ये राहणार्या एका शिक्षकाच्या घरी धाड टाकली.
या कारवाईमध्ये शिक्षकाच्या घरातील मोबाईल कॉम्प्यूटर आणि इतर सामग्री हस्तगत करून त्याला मुंबई येथील कुर्ला येथे त्याच्या दुसर्या घरी महाराष्ट्र एटीआयच्या माध्यमातून पढील तपास सुरू आहे. शिक्षक हा जमाती इस्लामिया या संघटनेशी जोडलेले असल्यामुळे आरोपींनी या शिक्षकाचे नाव तपासामध्ये घेतले होते.



Comments