top of page

दहावी, बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर

Oct 13, 2025
1 min read

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात येत असलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र फेब्रुवारी मार्च 2026 या वर्षाच्या परीक्षा तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.


महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे नागपूर छत्रपती संभाजी नगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण यांना विभागीय मंडळामार्फत आगामी फेब्रुवारी मार्च 2026 मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र व माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजेच इतर बारावी आणि दहावीच परीक्षेच्या लेखी प्रात्याक्षिक व इतर परीक्षांच्या तारखा मंडळांनी जाहिर केल्या आहेत. त्यानुसार इयत्ता दहावीची लेखी परीक्षा ही 20 फेब्रूवारी 2026 ते 18 मार्च 2026 या कालावधीत आयोजित केली जाणार आहे.


इयत्ता बारावीची म्हणजेच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा कालावधी हा 10 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 या कालावधीत होणार आहे. प्रात्याक्षिक लेखी तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच एन एस किंवा अंतर्गत व्यवसायिक अभ्यासक्रम प्रात्याक्षिक परीक्षा या इयत्ता बारावीच्या 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीमध्ये आयोजित केल्या जाणार आहेत.


इयत्ता दहावीच्या प्रात्याक्षिक परीक्षा या दोन फेब्रुवारी 2026 ते 18 फेब्रुवारी 2020 या कालावधीमध्ये आयोजित केल्या जाणार आहेत. अशी माहिती राज्य मंडळाचे सहसचिव प्रमोद गोफणे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

Comments


bottom of page