दहावी बोर्ड परीक्षेच्या परीक्षार्थींना चक्क मंडपात बसून सोडवावा लागला पेपर , बीडमधील कुर्ला केंद्रावर परीक्षा मंडळाचा धक्कादायक प्रकार
- Navnath Yewale
- 3 hours ago
- 1 min read

बीड: जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रावर दहावीच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. मात्र, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी परीक्षा मंडळाचा सावळा गोंधळ समोर आला आहे. बीडच्या कुर्ला परीक्षा केंद्रावर दहावीचा पेपर सोडविण्यासाठी परीक्षार्थींना चक्क मंडपात बसवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नियोजकांच्या या प्रकारामुळे परीक्षार्थींना अपुर्या सुविधांमध्ये परीक्षेला सामोरं जावे लागल्याने परीक्षार्थी पालकांतून संताप व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आज शुक्रवार 20 फेब्रूवारीपासून राज्यभरातील एकून 5 हजार 119 परीक्षा केंद्रावर घेतल्या जात आहेत. परीक्षेसाठी राज्यीरातून एकून 16 लाख 15 हजार 498 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 8 लाख 65 हजार 740 मुले,7 लाख 49 हजार 736 मुली आणि 13 ट्रान्सजेंडर आहेत. एकून 5 हजार 111 मुख्य केंद्रावर ही परीक्षा होत आहे.
बोर्ड परीक्षेसाठी केंद्रावर परीक्षार्थींसाठी अद्यवत मुलभूत सुविधां ज्यामध्ये पक्की इमारत, आसण व्यवस्था, स्वच्छतागृह, विज, पाणी यासह परीक्षेसाठी अवश्यक गरजां बंधनकारक आहेत. केंद्र मान्यतेपूर्वी परीक्षा मंडळाकडून तसा पाहणी अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात येतो, त्यानंतर कुठं मान्यतेसाठी विचार करण्यात येतो. असे असले तरी कुर्ला केंद्रावर चक्क परीक्षार्थींना पेपर सोडवण्यासाठी उघड्यावर मंडपामध्ये आसण व्यवस्थेची नामी शक्कल लढवण्यात आली. उघड्यावर मंडपाच्या सावलीत उकाड्याचा सामना करत परीक्षार्थींना पेपर द्याव लागला.
दरम्यान, याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, बीडमधील मंडपातील परीक्षेबाबत शिक्षणाधिकारी यांच्याकडून चौकशी अहवाल मागविण्यात आला आहे. ऐनवेळी कोणताही पर्याय नसल्याने मंडपात परीक्षा घेण्यास परवानगी द्यावी लागली. मात्र, याबाबत संबंधित दोषींवर कारवाई केली जाणार आहे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याबाबत काळजी घेतली जाईल असं बोडसे म्हणाले.



Comments