top of page

दहिवंडीच्या बनावट खवा कारखाना धाड, प्रकरणातील आरोपीस नोटीसवर सोडले?

नागरिकांच्या आरोग्याशी खेळ गंभीर गुन्हा नाही ?; पोलिस म्हणतात अजामिनपात्र गुन्हा, ...मग कारवाईचा फार्स कशासाठी संतप्त नागरिकांचा सवाल

बीड: बनावट खवा कारखान्यावर बुधवारी (दि.1) पोलिस आणि एफडीए ची संयुक्त छापेमारी करण्यात आली. या कारवाईत बनावट खवा, बर्फी, मिल्क केक, पामतेल यासह भेसळीसाठी लागणार्‍या मुद्देमालासह एका संशयितास ताब्यात घेण्यात आले होते. शिरुर पोलिसांनी संशयित आरोपीस नोटीस बजावून सोडून दिले आहे. पोलिसांच्या मते संशयितावर गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्याची कलम नाहीत केवळ जामिनपात्र गुन्ह्याची नोंद असल्याने नोटीस बजावून त्यास सोडले. एफडीएच्या फिर्यादी कर्मचार्‍यांच्या मते बनावट घातक रसायणाच्या वापराने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणं गंभीर गुन्हा नसेल तर छापेमारीचा फार्स कशासाठी? असा संतप्त सवाल नागरिकांतून केला जात आहे.


एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दुध, दुग्धजन्य पदार्थातील भेसळी विरोधात धाडसी कारवायांची मोहिम उघडली आहे. राज्यभरात सुरू असलेल्या धाडशी कारवायांमुळे भेसळमाफियांच्या झोपा उडाल्या असून शेकडो गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर अनेकजण अटकेत आहेत. प्रतिबंधीत गुटखा माफिया, विक्रेत्यांच्या विरोधात ज्या प्रमाणे मकोका अंतर्गत गुन्ह्याचा ड्राप प्रस्तावित केला आहे. प्रतिबंधीत गुटख्या प्रमाणेच आता दुध भेसळ प्रकरणातही महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा (मकोका) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा ड्राप सरकारकडे पाठवण्याच्या हालचाली सुरू आहेत.


राज्यभरात दुध भेसळ प्रकरणी धाडीमध्ये कोट्यावधींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असूनप अनेकजणांना अटक करण्यात आली आहे. पुण्याच्या मंचरसह पाच जिल्ह्यात टाकेलेल्या धाडीमध्ये कोट्यावधी रुपयांचे भेसळयुक्त दुध, भेसळीसाठी लागणारे साहित्य यासह एकून तेरा जणांना अटक करण्यात आले आहे. ज्यामध्ये राजकारण्यांच्या नोतेवाईकांचाही समावेश आहे. दुस्तुरखुद्द आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पत्रकार परिषदेत या कारवाईचा उल्लेख करत भेसळयुक्त दुधाच्या निर्मितीपासून आरोपींच्या नामोल्लेखापर्यंत इतंभूत माहिती दिली.


एकीकडे बीडचे भूमिपूत्र असेलेले तुकाराम मुंडे यांनी भेसळीतून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार्‍या भेसळमाफियांचे कंबर्डे मोडत असताना त्यांच्याच जिल्ह्यातील विभाग मात्र पडद्यामागून भेसळमाफियांना वाचवण्यासाठी आटपिटा करत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.


बीडच्या दहिवंडी (ता.शिरुर कासार) शिवारात बुधवारी (दि.1) रात्री बनावट खवा कारखान्यावर शिरुर पोलिसांनी छापेमारी केली, पुढील कार्यवाहीसाठी एफडीएच्या कर्मचार्‍यांना माहिती देवून घटनास्थळावर पाचारण करण्यात आले. शिरुर पोलिस, माध्यम प्रतिनिधींसह एफडीएचे कर्मचार्‍याचा या कारवाईत सहभाग होता. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या कारवाईत बनावट खवा, बर्फी, मिल्क केक यासह भेसळीसाठी लागणारा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रत्यक्षात जप्त मालाची मोजदाद करण्यासाठी छापेमारी करणार्‍या एफडीएच्या कर्मचार्‍यांकडे कसल्याही प्रकारचे मापक नव्हते. तरीही दुसर्‍या दिवशी तयार करुन आणलेल्या लेखी तक्रारीमध्ये जप्त मालाचे मापनाचा उल्लेख करण्यात आला आणि त्यानुसार शिरुर पोलिसात कार्तिक सवाईसिंग राजपुरोहित याच्या विरोधात अन्न सुरक्षा मानदे कायदा 2006 चे कलम 57 तसेच भारतीय न्याय संहिता कलम 274,275 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.


मोजदादी शिवाय जप्त मालाचे मुल्यांकन कसे? खवा कारखान्यावरील सीसीटीव्ही फुटेजचे डिव्हीआर कसे जळाले?, छापे मारीनंतर गुन्हा दाखल करण्यासाठी तब्बल 16 तासांचा विलंब का?, शहरातील संशयित मिठाई दुकानातील नमुने घेण्यास दोन दिवसाचा विलंब का?, छापेमारीमध्ये बनावट खवा जवळपास 700 किलोपर्यंत असताना एकून माल केवळ 137 किलो असल्याची नोंद? गुन्ह्याची तिव्रता कमी करण्यासाठीच जप्त मालाचे मुल्यांकन कमी नोंदविण्यात आले का? एफडीएच्या कर्मचार्‍यांनी शिरुर पोलिसात तोंडी सांगून फिर्याद का दिली नाही? दुसर्‍या दिवशी 3:00 वाजता फिर्यादीची प्रिटेड स्क्रिप्ट कोणाच्या सांगण्यावरून तयार करून पोलिसांच्या हवाली केली? असे अनेक प्रश्न एफडीए चे अधिकारी कर्मचार्‍यांचे आदृष्य हात आरोपींना वाचवण्यात धडपडत असल्याकडे बोट करत आहेत.


या कारवाईतील आरोपीस शिरुर पोलिसांनी तीन दिवसांत एका नोटीसवर सोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दुधाशिवाय घातक रसायणांच्या मिस्त्रणाने तयार करण्यात येणारा बनावट खवा बीड जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर, लातूर, जालना, जळगाव, आहिल्यानगर जिल्ह्यापर्यंत पुरवठा करण्यात येत होता. मागिल दिड वर्षापासून हा कारखाना सुरू होता याची तसूभरही एफडीएला कल्पना नव्हती हे जगावेगळं अश्चर्य म्हणावं लागेल. प्रत्यक्षात भेसळमाफियांना वाचवण्यासाठी छापेमारीतील कर्मचार्‍यांनी दुसर्‍या दिवसी तक्रारीची प्रिंटेड स्क्रिप्ट पोलिसांच्या हवाली केली आणि त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. जेने करुन ताब्यातील आरोपीस तसूभरही राक्षसी कृत्याची जानिव होवू नये आणि तो सहिसलामत लोकांच्या आरोग्याशी खेळण्यासाठी बाहेर पडावा.


संतप्त नागरिकांकडून एफडीएच्या अधिकारी कर्मचार्‍यांच्या कर्तव्यावर संताप व्यक्त करण्यात येत असून या कारवाईत एफडीएने भेसळयुक्त खव्यातून तयार केलेल्या तुपात आंघोळ केल्याचा आरोप केला जात आहे. छापेमारी पूर्वी शिरुर पोलिसांच्या माहितीपासून तिसर्‍या दिवशी संशयित मिठाई दुकानातील नमुने घेण्यापर्यंत कर्मचार्‍यांचे सीडीआर काढून कारखान्यातील सीसीटीव्ही डिव्हीआर जाळण्यापर्यंत घटनांची त्रयस्त विभागीय स्तरावरील अधिकार्‍यांच्या समितीमार्फत चौकशी करण्यात यावी यामागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार सुरेश धस यांच्यासह आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कडे पाठपुरावा करण्याचे संतप्त नागरिकांडून सांगण्यात आले आहे.

bottom of page