top of page

ाज्यपालांच्या निवास्थानी कर्तव्य बजावणार्‍या जवानाची गोळी झाडून आत्महत्या

मुंबई: मुंबईतील मलबार हिल परिसरात असलेल्या राज्यपालांच्या लोकभवनामध्ये एका एसआरपीएफ जवानाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. कौस्तुभ सांगळे (वय 26) असे या कॉन्स्टेबलचे नाव असून तो कोल्हापूरच्या गट 16 मध्ये कार्यरत होता, असे पोलिसांनी सांगितले. मलबार हिल येथील महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवास्थान असलेल्या लोक भवनमध्ये सुरक्षेसाठी कौस्तुभ सांगळे याची नियुक्ती होती.


राज्य राखीव पोलीस दलात असलेल्या कॉस्तुभ या कॉन्स्टेबलने सोमवारी संध्याकाळी आपल्या सर्व्हिस शस्त्राने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. गोळी झाडल्यानंतर मोठा आवाज झाला. आवाज ऐकल्यानंतर इतर सुरक्षा कर्मचारी तात्काळ आवाज आल्याच्या दिशेने धाव घेतलीर त्यावेहभ तिथे कौस्तुभ खाली पडलेला होता. त्याचा जागीच मृत्यू झाला होता. असे पालिसांनी सांगितले.


दरम्यान, घटनास्थळी कॉस्तुभजवळ कोणतीही सुसाईड नोट पोलिसांना सापडली नाही. पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिस त्यावने टोकाचे पाऊल का उचलले याचा तपास करत आहेत.

Comments


bottom of page