दादा गरुडचा व्हिडिओ व्हायरल; जरांगे पाटील हत्या कट आरोप प्रकरणात मोठं ट्विस्ट

जालना: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आपल्या हत्येचा गट रचल्याचे गंभीर आरोप केले आहेत, धनंजय मुंडे यांनी आपल्या हत्येची सुपारी दिली, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे, दरम्यान आता या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दादा गरुड याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. असा आरोप आहे. या प्रकरणात जालना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अक केलं आहे. दादा गरूड आणि अमोल खुणे असं या दोन संशयितांचं नाव आहे. या प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांनी माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांनीच आपल्या हत्येची सुपारी दिल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.दरम्यान, आता या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे.
या प्रकरणात अटक असलेला संशयित दादा गरूडचा धनंजय मुंडेसोबत भेट झाली, या कबुलीचा व्हिडिओ समोर आला आहे. परळीतील शासकीय विश्रामगृहात भेट झाल्याचा मनोज जरांगे पाटील यांचा दावा होता, जरांगे पाटील यांच्या दाव्यानंतर आता कबुली देतानाच दादा गरुडचा व्हिडिओ समोर आला आहे. शासकीय विश्रामगृहात परळीतील अनेक रथी, महाराथी बसलेले होते, अमोल खुणे, कांचन मुंडे आणि धनंजय मुंडे हे 25 मिनिटं दुसर्या खालीत बसले होते, असा दावा दादा गरुड याने या व्हिडिओमध्ये केला आहे. मी तीथे दुसर्या कामासाठी गेलो होतो असंही तो या व्हिडिओमध्ये बोलत आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी अमेल खुणे हा बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातील रहिवासी आहे, पोलिसांकडून या प्रकरणात त्याच्या घराची देखील तपासणी कर्यात आली आहे, दरम्यान अमोल खुणे याच्या पत्नीने आपल्या पतीवरील आरोप फेटाळले आहेत. त्यांना या प्रकरणात अडकवण्यात येत असल्याचा दावा तिने केला आहे. दारू पाजून त्यांना फसव्यात आलं, माझे पती मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात एक अपशब्द सुद्धा सहन करू शकत नाहीत, त्यांनी आणि मनोज जरांगे पाटील यांनी एका ताटामध्ये जेवण केलं आहे, असंही आमोल खुणे याच्या पत्नीने म्हटलं आहे. तर दुसरीकडे माझा मुलगा असं करूच शकत नाही असं अमोल खुणे च्या आईने म्हटलं आहे.



Comments