top of page

दिल्ली स्फोट प्रकरणात पुलवामा कनेक्शन; डॉ. उमरचा जवळचा मित्र डॉ. सज्जाद अहमद पोलिसांच्या ताब्यात

ree

लाल किल्ल्याजवळ झालेलया स्फोटाप्रकरणी जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा येथून डॉ. सज्जाद अहमद नावाच्या एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. डॉ. सज्जाद अहमद हा स्फोटात स्वत:ला उडवून देण्यार्‍या डॉ. मोहम्मद उमरचा मित्र आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी सज्जादला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दिल्ली स्फोटात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 25 जण मधील आहेत, त्यांच्यावर एलएनजेपी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


सोमवारी संध्याकाळी लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटातील कारचा चालक फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूलशी जोडला होता. पुलवामा येथील रहिवासी आणि व्यवसायाने डॉक्टर उमर मोहम्मद लाल किला मेट्रो स्——टेशनजवळील पार्किंग क्षेत्रात झालेल्या स्फोटात वापरलेली हुंदाई कार चावलत होता. स्फोटात अमोनियम नायट्रेट, इंधन तेल आणि डेटोनेटरचा वापर केला असावा, असे पोलिसांनी सांगितले. दिल्ली स्फोट फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूलशी जोडला जाऊ शकतो, तिथून 360 किलोग्राम अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आले होते, असे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.


दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमध्ये मास्क घातलेला एक व्यक्ती कार चालवत असल्याचे पोलिसांनी सांगितले. लाल किल्ला आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी अनेक पथके तैनात करण्यात आली आहेत. असे त्यांनी सांगितले. सोमवारी संध्याकाळी एका संथ गतीने चालणार्‍या कारमध्ये झालेल्या शक्तिशाली स्फोटानंतर दिल्ली पोलिस हाय अलर्टवर आहेत. या स्फोटात किमान 10 जणांचा मृत्यू झाला, 25 जण जखमी झाले आणि अनेक वाहने जळून खाक झाली.

Comments


bottom of page