दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ कारमध्ये भीषण स्फोट, 9 ठार 24 जखमी
- Navnath Yewale
- Nov 10
- 2 min read

नवी दिल्लीकरांसाठी आजचा दिवस अत्यंत धक्कादायक ठरला आहे. दिल्लीच्या लालकिल्ल्यासमोर जोरदार स्फोट झाला आहे. एका कारमध्ये हा स्फोट झाल्यानंतर बाजूलाच असलेल्या दोन्ही कारनेही पेट घेतला. त्यासोबतच आजूबाजूच्या वाहनांनीही पेट घेतल्याने आगीचे लोळ उठले. स्फोटाचा आवाज आणि आगीचे लोळ यामुळे या परिसरात असलेल्या नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. जो तो जीव मूठीत घेऊन पळत होता. त्यामुळे या परिसरात एकच ताणव निर्माण झाला. या स्फोटात एकून 9 जण ठार झाले असून 24 जण जखमी झाले आहेत. ज्या कारमध्ये हा स्फोट झाला ती कार कोणती होती? पोलिसांनी याचा छडा अवघ्या काही मिनिटात लावला आहे.
दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेट नंबर 1 जवळ सोमवारी रात्री प्रचंड मोठा स्फोट झाला. प्राथमिक तपासानुसार एका इको व्हॅन मध्ये हा स्फोट झाल्याचं दिसून आलं. इको व्हॅनमध्ये स्फोट झाल्याचं पोलिसांनी तात्काळ शोधून काढलं असलं तरी आता ही कार कुणाची आहे? याचा शोध घेतला जात आहे. या स्फोटात जवळच असलेली एक स्कूटी आणि ऑटो रिक्शा जळून खाक झाली आहे. या शिवाय बाजूलाच असलेले अनेक वाहनेही जळून खाक झाली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाचा आवाज अत्यंत मोठा होता. हा स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूच्या इमारतीच्या काचा फुटल्या. काही लोकांच्या मते घटनास्थळी रक्ताचे सडे आणि काचांचे तुकडे विखुरलेले होते.
दरम्यान स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फायर टेंडर, रुग्णवाहिका आणि वरिष्ठ पोलिस अधिकारीही तात्काळ घटनास्थळी आले. अग्निशमन दलाच्या जवानाने तात्काळ आग आटोक्यात आणली. मात्र, स्फोटाच्या तीव्रतेला हाय इंटेंसिटी ब्लास्ट म्हटलं जात आहे.
कार हळूहळू येत होती: सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या कारमध्ये स्फोट झाला, ती कार अत्यंत हळूहळू मेट्रो स्टेशनजवळ येत होती. या कारमध्ये तीन प्रवासीही होते, अशी माहिती मिळत आहे. हा स्फोट अत्यंत भीषण होता. एका कारमध्ये स्फोट झाला, मात्र, या स्फोटाची झळ तीन ते चार वाहनांना बसली. तज्ज्ञांच्या मते, हा बॅटरी ब्लास्ट असता तर स्फोटाची तीव्रता मयार्र्दित असती. पण तसं झालं नाही. त्यामुळे आता या स्फोआचा तपास इतर यंत्रणा करण्याची शक्यता आहे.
झाडाझडती सुरू : स्फोटानंतर येथील एलएनजेपी रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयात असंख्य रुग्ण आले असून त्यातील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, स्फोट झालेल्या परिसर सील करण्यात आला आहे. दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला असून वाहनांचा कसून तपास केला जात आहे. तसेच संशयितांची झाडाझडती घेतली जात आहे.



Comments