top of page

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे वारसाचा मुद्दा: धनंजय मुंडेंनीच मुंडे घराण्यात दरी निर्माण केली- जरांगे पाटील

ree

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या राजकिय वारसदारावरुन महाराष्ट्रात पुन्हा एकदा वादंग निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. बीडमधील ओबीसी मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडे हेच गोपीनाथरावांचे खरे वारसदार असल्याचे विधान केले होते. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री पंकजा मुंडे यांचे मामा व दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे मेव्हूने प्रकाश महाजन यांनी मंत्री छगन भुजबळ यांना थेट सल्ला दिला आहे की, अनेक वर्षानंतर पुन्हा एकत्र आलेल्या मुंडे भाऊ- बहिणींमध्ये मिठाचा खडा टाकू नका, तसेच दुसर्‍यांच्या घरात वारस ठरवण्याआधी स्वत:च्या वारस मुलाग की पुतण्या हे ठरवावे, असं म्हणत त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाना साधला. तर पंकजा मुंडे यांना जनतेने आणि समाजाने संघर्षानंतर वारसदार म्हणून स्वीकारले आहे, असे देखील प्रकाश महाजन म्हणाले.


गोपीनाथ मुंडे यांच्या वारसावरून करुणा शर्मा- मुंडे यांच्या धनंजय मुंडेच गोपीनाथ मुंडे यांचे खरे वासदार असल्याच्या वक्तव्याचंही प्रकाश महाजन यांनी खंडण करत ‘ कोण करुणा मुंडे, हा त्या जर धनंजय मुंडे यांच्या पत्नी असतील तर त्यांनी आगोदार आपल्या कुंकवाची रस्त्यावर येऊन करत असलेली बदनामी थांबवावी, गोपीनाथ मुंडे यांचे वारस ठरवायला कुटुंबात आणखी ज्येष्ठ लोक आहेत. त्यांनी तेवढं जरी केलं तरी भरपूर झालं अस म्हणत प्रकाश महाजन यांनी करुणा शर्मा-मुंडे यांचे कान टोचले.



गोपीनाथ मुंडे यांच्या वारस प्रकरणात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

जासंगे वसटील म्हणाले की, वैचारिक मतभेद असू नयेत. देशात ठसा उमटवणार्‍या व्यक्तीबद्दल आपल्याला आत्मीयता असली पाहिजे. छगन भुजबळांनी संस्कारहीन वागू नये. रक्ताने हात भरलेले लोक भुजबळांनी जमा केलेले आहेत. भुजबळ बीडला आला आणि भेद पसरवून गेला.मुंडे कुटुंबाला तुम्हाला हिणवायचं आहे का? असा सवाल त्यांनी छगन भुजबळ यांना विचारला.

तो मिळेल त्या संधीत त्या पोरीला चेंगरायचं बघतो, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडेची बाजू घेत धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. मुंडे घराण्यात दरी धनंजय मुंडेनीच तयार केली आहे.


आपल्या बापाला याच्यामुळे मान खाली घालून चालावं लागलं, हे खर्‍या वारसाला कळत नाही का? खरा वारसा त्याच्यासोबतच हिंडत फिरतो. मग आपल्या सारख्याने काय बोलावं? खर्‍या वारसाने असे लोक खड्यासारखे बाजूला करावेत. पंकजा मुंडेच गोपीनाथ मुंडेची खरी वारसदार आहेे हे म्हणण्याची गरज नाही. पंकजा मुंडे वारसदार नाही तर मग वारसदार कोण? असा सवाल देखील मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. नुसती बहीण-बहीण म्हणून गळ्यात हात टाकून होत नाही. त्यांनीही तुम्हाला आपलं समाजायला हवं, असे देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Comments


bottom of page