top of page

दिवंगत सरपंच सतोष देशमुख यांना अभिवादन, आज प्रथम पुण्यस्मरण

देशमुख कुटुंबीय,मान्यवरांसह मस्साजोगकरांच्या आश्रुंचा बांध फूटला

ree

बीड: बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून निर्घुन हत्या करण्यात आली होती. तिथीनुसार त्यांचे आज प्रथम पुण्यस्मरण आहे. यानिमित्त समाधान महाराज शर्मा यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात होते. मराठा आंदोलक जरांगे पाटील , उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी (श.प.) आमदार संदिप क्षीरसागर, पँथरचे दिपक केदार यांच्यासह आदी मान्यवरांनी अभिवादन केले.

ree

समाजसेवेच्या माध्यमातून गावाचा गाडा हाकणारे सरपंच संतोष देशमुख यांची गतसाली 9 डिसेंबर रोजी अपहरण करून अमानुष हत्या करण्यात आली. त्यांना मारताना मारेकर्‍यांनी क्रौर्याची परिसीमा पार केली. या हत्येने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली, अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला. देशमुख हत्या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी वाल्मिक कराड याच्यासह अन्य सात आरोपींना अटक करण्यात आली. दुर्दैवाची बाब म्हणजे देशमुख हत्येला एक वर्ष पूर्ण झाले तरीही अजूनही आरोप निश्चित करण्यत आलेली आहे.

ree

दरम्यान देशमुख कुटुंबियांसाठी आजचा दिवस अत्यंत भावनिक होता. घरातील कर्ता पुरुष गेल्याने घराची संपूर्ण जबाबदारी त्यांचे लहान बंधू धनंजय देशमुख यांच्यावर आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येला तिथीनुसार आज एक वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्ताने समाधान महाराज शर्मा यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात मराठा समाजाचे आक्रमक मोर्चे निघाले. देशमुख यांना न्याय देण्यासाठी मराठवाड्यात मराठा समाज रस्त्यावर उतरला. महाराष्ट्रातही मोठ्या संख्येने देशमुख कुटुंबियांच्या न्यायासाठी मोर्चे निघाले. दहावीची परीक्षा तोंडावर असूनही सरपंचांची लेक वैभवी देशमुख हिने देखील मोर्चामध्ये सहभागी होऊन वडिलांच्या न्यायासाठी सरकारपुढे पदर पसरला. या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे, त्याला बेड्या ठोकण्यात अद्याप यश आलेले नाही. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी वाल्मिक कराड याच्यावर आरोप झाले.

ree

देशमुख यांना अमानुष मारहाण करताना मारेकर्‍यांनी वाल्मिक कराड याला फोन केल्याचे समोर आले. तसेच पवनचक्की प्रकरणात वाल्मिक कराड याचे काळे कारनामे समोर आल्यानंतर आणि देशमुख यांना मारहाण करतानाचे फोटो, चित्रफित समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर अधिवेशनाच्या दिवशीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वैभवीने हिने माझे बाबांना जाऊन वर्ष लोटले तरी अद्याप आम्हला न्याय मिळाला नाही”अशी भावनीक साद घालत प्रश्न विचारला. संदीप क्षीरसागर यांनी फरार कृष्णा आंधळे याचे काही बरं-वाईट केल्याचा पुन्हा अरोप केला.वाल्मिक कराडला फाशी होत नाही तो पर्यंत आम्ही शांत बसणार नाहीत, वाल्मिक कराडचा सीडीआर काढण्याचीही मागणी क्षीरसागर यांनी केली. सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाना साधत क्रूर हत्या करणार्‍याची केवळ राजकीय स्वार्थासाठी आठवण येते असं म्हणनं कितपत योग्य आहे असे म्हणत धनंजय मुंडे यांच्यावर निशाना साधला.

ree

धनंजय देशमुख, वैभवी देशमुख यांच्यासह मस्साजोग ग्रामस्थांच्या आश्रुंचा बांध फूटला. मान्यवरांशी बिलगून साठलेल्या दु:खला वाट मोकळी करून दिली. मान्यवरांनी सतोष देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

Comments


bottom of page