top of page

दिवाळीपूर्वी एक लाख शेतकर्‍यांच्या खात्यात टाका - उद्धव ठाकरेहंबरडा मोर्चातून उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाना; हि तर शेतकर्‍यांची थट्टा

ree

छत्रपती संभाजीनगर: शिवसेनचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आज छत्रपती संभाजीनगरमध्ये हांबरडा मोर्चा काढण्यात आला. शेतकर्‍यांचे प्रश्न घेवून उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर जोरदार हल्लाबोल केला.


विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आंबादास दानवे, माजी मंत्री अमित ठाकरे, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह शिवसेना (उबाठा) पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.


मोर्चास संबोधीत करताना उद्धव म्हणाले की, मी या पॅकेजचे समर्थन करायला तयार आहे. पण माझी एक अट आहे. मुख्यमंत्री बोललेत खरडून गेलेल्या जमिनिला हेक्टरी मनरेगातून साडेतील लाख रुपये देणार आहोत. मग मी मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो की, तुमची नियत असेल असेल तर दिवाळीआधी तीन लाखातील एक लाख रुपये माझ्या शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये जमा करा, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसनेने (उबाठा) छत्रपती संभाजीनगरमध्ये आज शनिवारी हंबरडा मोर्चा काढला.

पूरग्रस्त भागातील शेतकर्‍यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने 31 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. याच पॅकेजबद्दल हंबरडा मोर्चास संबोधीत करताना उद्धव ठाकरे म्हणाले की. मी या सरकारच्या 31 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजचं समर्थन करतो, पण माझी एक अट आहे बघा तुम्हाला पटतेय का? जीवन उद्ध्वस्त झालंय. जमिन खरडून गेली आहे. तुम्ही रब्बीचं पिक घेणार कसं? 50 हजार आम्ही का मागत आहोत, त्याचं कारण तुम्ही जाऊन बघा की जमिनीची अवस्था काय झाली आहे.


मुख्यमंत्री जे बालेले की, खरडून गेलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टर मनरेगातून 3.50 लाख रुपये देणार. मग मुख्यमंत्र्यांना तुमच्यावतीने आव्हान देतो की, दिवाळीपूर्वी त्या साडेतीन लाखातील एक लाख शेतकर्‍यांच्या खात्यात टाकाच. बाकीचं आपण नंतर बघू’ अशी मागणी उद्धव ठाकरेंनी सरकारकडे केली.


“ मी मुख्यमंत्री असताना माझी नियत काढत होतात, आता तुमची नियत काढतो, पण, मी राजकारण करत नाही. एका शेतकर्‍याने मदतीसाठी विचारलं तर त्याला हे सांगतात की, बाबा राजकारण करू नको. मग तुम्हाला राजकारण करण्यासाठी शेतकर्‍यांची मते पाहिजेत. शेतकर्‍यांच्या मतांवर तुम्ही सरकार आणता. शेतकर्‍यांच्या मतांवर तुम्ही राजकारण करता आणि शेतकर्‍याने न्याय हक्क मागितला तर तुम्ही म्हणायचं राजकारण नाही करायचं? हे कुठले सरकार आहे?” असा सवालही त्यांनी सरकारला केला.


“ मनरेगातू शेतकर्‍यांना साडेतीन लाख कसे देणार? द्यायचे तसे देऊन दाखवाच, पण एक लाख रुपये दिवाळीपूर्वी माझ्या शेतकर्‍यांच्या खात्यात टाका”


दरम्यान, हंबरडा मोर्चात उद्धव ठाकरेंनी सरकारवर सडकून टीका केली. “ राजा उद्धार झाला हाती काय दिला... भोपळा ... आता येता येता एका शेतकर्‍याने सांगितलं की, साहेब हाती टरबूज दिलं. राजा उदार झाला आणि हातात काय दिलं टरबूज. ही शेतकर्‍यांची थट्टा चालली आहे” असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

Comments


bottom of page