दुर्गम भागातील पोलिसांच्या धाडसाचा सन्मान देशातील 121 पैकी 31 शौर्य पदके एकट्या गडचिरोलीत
- Navnath Yewale
- Jan 25
- 2 min read

गडचिरोली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसांध्येला देशातील पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यासोबतच देशसेवेत कर्तव्य बजावणार्या पोलीस कर्मचार्यांचाही राष्ट्रपती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येत असून, त्याचीही घोषणा करण्यात आली. नक्षलवाद्यांशी दोन हात करत दुर्गम भागात सेवा बाजावणार्या गडचिरोली पोलीस दलाच्या 31 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना राष्ट्रपतींचे पोलीस शौर्य पदक जाहीर झाले आहे. प्रजास्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशात जाहीर झालेल्या एकूण 121 शौर्य पदकांपैकी 31 पदके एकट्या गडचिरोलीच्या जवानांना मिळाली आहेत.
जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातर सुरक्षिततेसाठी तैनात असलेल्या जवानांचे मनोबल उंचावले आहे. 22 एप्रिल 2018 रोजी भामरागड तालुक्यातील बोरीया-कसनासूरच्या घनदाट जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली होती. या एकाच मोहिमेत 40 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश आले होते. नक्षलविरोधी अभियानातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी आणि यशस्वी कारवाई मानली जाते.
या मोहिमेत प्रत्यक्ष शौर्य गाजवणारे पोलीस निरिक्षक अमोल फडतरे, पोलिस उपनिरिक्षक मधुकर नैताम, वासुदेव मडावी, विलास पोरतेट, संतोष नैताम यांच्यासह 31 जवानांच्या कामगिरीची दखल आता राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. शौर्य पदकांसोबतच 394 पालीस अंमलदारांना पदोन्नती देखील देण्यात आली आहे. यामध्ये कर्तव्य बजावताना वीगती प्राप्त झालेल्या 14 शहीद जवानांचाही मरणोत्तर सन्मान करण्यात आला आहे. शहीद झालेल्या 7 हवलदारांना सहायक पोलीस उपनिरिक्षक पदी, तर 7 पोलीस नाईकांना पोलीस हवलदार पदी मरणोत्तर पदोन्नती देण्यात आली आहे. याशिवाय 10 जवानांना त्यांच्या विशेष कामगिरीसाठी वेगवर्धित पदोन्नती देण्यात आली. यामध्ये 82 हवालदारांना सहायक पोलीस उपनिरिक्षक म्हणून, तर 303 पोलीस नाईकांना पोलीस हवालदार म्हणून पदोन्नती मिळाली आहे.
भंडार्यात उपनिरिक्षक गंगाधर घुमरेंना राष्ट्रपती पदक : भाराताच्या 77 व्या प्रजास्ताक दिनानिमित्त देशातील पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील एकूण 982 अधिकारी आणि कर्मचार्यांना शौर्य आणि सेवा पदक जाहीर करण्यात आली आहेत. यात महाराष्ट्रातील 89 अधिाकरी आणि कर्मचार्यांना विविध क्षेत्रातील कामगिरीसाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यात भंडार्याच्या राज्य गुप्त वार्ता विभागाचे पोलीस उपनिरिक्षक गंगाधर घुमरे यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्याचे ते एकमेव राष्ट्रपती पदक विजेते पोलीस उपनिरिक्षक ठरले आहेत. घुमरे हे 1991 च्या बॅचचे पोलिस अंमलदार आहेत.



Comments