top of page

दुष्काळाच्या आढावा बैठकीत मंत्री, खासदारांचा काजू-बदामांवर ताव नांदेडमधील संतापजनक घटनेचा व्हिडिओ व्हायरल; खासदार संजय जाधव यांच्यावर टिकेची झोड

3 hours ago
2 min read

नांदेड: राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाअभावी शेती संकट आली असून शेतकरी पिकांच्यास नुकसानीमुळे चिंतेत असताना नोंदडमध्ये झालेल्या दुष्काळ आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या दुष्काळी बैठकीत संतापजनक प्रकार समोर आला. दुष्काळासारख्या संवेदनशील मुद्यावर लोकप्रतिनिधी आणि अधिकार्‍यांनी चर्चा करण्या आधी चक्क काजू-बदामांवर ताव मारला. बैठकीत काजू-बदामावर ताव मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने बैठकीतील काजू- बदामांच्या प्लेट हटवल्या. शेतकर्‍यांप्रती दाखवलेल्या असंवेदनशीलतेमुळे राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे.

अधिकारी-नेतेमंडळींनी शेतकर्‍यांना जखमेवर मीठ चोळले आहे. अशा संतप्त भावना विरोधकांनी व्यक्त केल्या. या प्रकाराचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावरूनही टीका सुरू झाली आहे.


राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पालकमंत्री अतुल सावे, नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण, परभणीचे खासदार संजय जाधव, खासदार रामराव वडकुते, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टिकर, खासदार कल्याण काळे, खासदार अजित गोपछडे, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, हेमंत पाटील, चंद्रकांत नवघरे, बाबुराव पाटील कोहळीकर, सैईद खान, कैलास पाटील, अमर राजुरकर, तुषार राठोड, आनंदराव पाटील बोंढारकर, यांच्यासह आजी- माजी खासदार, आमदार तसेच अधिकारी उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे दुरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले आहे. राज्यातील अनेक भागांत पावसाचे प्रमाण कमी असल्याने खरीप पिकांच्या नुकसानीचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतकर्‍यांकउून नुकसानभरपाई आणि दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असतानाच ही बैठक पार पडली.


विशेष म्हणजे या बैठकीत उपस्थित असलेले मंत्री, आमदार, खासदार काजू बदामावर ताव मारत असलेला व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे सर्व सामान्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यानंतर शिवसेना खासदार बंडू जाधव यांनी होऊ द्या माझ्यावर टीका, माध्यमांनी हा फालतू प्रश्न उपस्थित केल्याचे वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना तावातावाने सांगितले. मराठवाड्यासह विदर्भातील पिके करपून गेली आहेत. खरीपातील सोयाबीन,बाजरी, कापुस, तुर, उडीद, मुग, भूईमुग यासह कडधान्यांचे उत्पान शेतकर्‍यांच्या हातून गेले. पावसाअभवी खरीप पिकं करपून गेल्याने आधिच बीयाने-खतांचा खर्च आणि त्यात हाता तोंडाशी आलेला खरीपाच घास हिरावल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. राज्यातील मोठ्या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असली तरी लघू व मध्यम तलाव कारडे ठाक आहेत.


सिंचना अभावी पाणीपातळी खलावल्याने पावसाळ्यात बहूतांश गावखेड्यांसह वाडी वस्ती तांड्यांना टँकरची आस आहे. तहान भागवण्यासाठी पावसाळ्यात नागरिकांना भटकंती करावी लागत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात असून जनावरांच्या चारापाण्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमिवर मराठवाड्यातील दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी नांदेडमध्ये आज शनिवारी (दि.19 सप्टेंबर) बैठक संपन्न झाली. बैठक दुष्काळाच्या आढव्याची असतानाही मंत्री, लोकप्रतिनिधी काजू- बदामावर ताव माराताना दिसले. मंत्री, लोकप्रतिनिधी काजू- बदामावरप ताव मारत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने विरोधकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. त्यातही खासदार संजय (बंडू) जाधव काजू-बदामावर ताव मारत असल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाल्याने त्यांच्यावर टिकेची झोड उठवली आहे.


या बैठकीला शिवसेना (शिंदे) खासदार बंडू जाधव काजू-बदाम खाताना दिसल्याने त्यांची चर्चा सुरू झाली आहे. शेतकरी उद्ध्वस्त झालेला असताना मंत्री काजू- बदाम कसे खाऊ शकतात, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे.यांना राज्यातील परिस्थितीची जाणीव तरी आहे का? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी जोदार टिका केली. हतबल शेतकर्‍यांच्या दु:खाची यांना काहीच जाणिव नसल्याची टीका ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमाव अंधारो यांनी केली.


मुख्यमंत्र्यांनी प्रशासनावर खापर फोडले: याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनावर खापर फोडलं आहे. बैठकीच्या वेळी प्रशासन ड्राय फूट आणते. मात्र, दुष्काळाची बैठक असताना हे टाळायला हवं होतं, अशा वेळी संवेदनशील राहिले पाहिजे. या शब्दांत त्यांनी प्रशासनाचे कान टोचले. त्याचवेळी दुष्काळ आहे म्हणून कोणी हे जाणूबुजून केले नाही, असं म्हणत त्यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. मंत्रीमंडळ बैठकीत दुष्काळावर चर्चा झाली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना आवश्यक ती मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. तसेच दुष्काळी उपाययोजना करून शेतकर्‍यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Comments


bottom of page