देशमुख कुटुंबीयांच्या न्यायासाठी मस्साजोगला राज्यव्यापी बैठक- जरांगे पाटील
- Navnath Yewale
- 8 hours ago
- 2 min read
सरंपच संतोष देशमुखांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण; मस्साजोग करांनी पाळला काळदिवस

बीड: बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 9 डिसेंबर एक वर्ष पूर्ण झाले. मस्साजोग ग्रामस्थांनी आजचा काळा दिवस पाळून दिवंगत संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी न्यायदेवतेल कोणतं साकडं घालायचं असा प्रतिप्रश्न उपस्थित केला. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मस्साजोगला भेट दिवंगत संतोष देशमुख यांना अभिवादन केले. देशमुख कुटुंबीयांच्या न्यायासाठी लवकरच मस्साजोगमध्ये राज्यव्यापी बैठकीचे घोषणाही त्यांनी केली.
मस्साजोग(ता.केज) येथील सरपंच संतोष देमुख यांचे खंडणी प्रकरणातून आपहरण करून क्रूर हत्या करण्यात आली होती. हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार सुरेश धस यांनी प्रश्न उपस्थित करून सरकारसह राज्याचे लक्ष वेधले होते. संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे माणवतेला काळीमा फासणारे ह्रदय पिळवटून टाकणारे फोटो ही व्हायरल झाले होते. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपींना अटक करून कठोर शासन व्हावे या मागणीसाठी राज्यभरता मोर्चे आंदोलनं करण्यात आली होती.
सतोष देशमखु यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाने राज्यभरात संताप उसळून आला होता. त्यानंतर काही दिवसात आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. खंडणी व हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा स्वत: पुणे सीआयडी कार्यालयात हजर झाला होता. आरोपींना कठोर आणि फाशीच्या शिक्षेसाठी प्रकरणात प्राख्यात वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याच्या कुटुंबीयांच्या मागणीनुसार खटल्यासाठी अॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली.
संतोष देशमुख हत्या प्रकरण न्यायप्रविष्ट असून आरोपींच्या वतिने कृल्प्या लढवून वेळ घालवण्यात येत असल्याने प्रकरणाची तारीख पे तारीख सुरू असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. शिवाय अॅड. उज्वल निकम यांनीही कोर्टात केवळ पुढची तारीख मिळत असल्याने हजर राहत नसल्याची खंत व्यक्त केली.
परळी नगरपरिषद निवडणूकीच्या प्रचारसभेत आमदार धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड याची आठवण येत असल्याचे वक्तव्य केले होते. ‘ आण्णा बाहेर येणार आहे’ अशी एक ऑडिओक्लिप व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली. देशमुख कुटुंबीयांच्या न्यायासाठी आरोपींना फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचे सांगत आता कोर्ट चार्जफेम करणार आहे. चार्ज फेम झाल्यानंतर चार महिन्याच्या आत सर्व आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्याची आम्ही वाट पाहू, फरार कृष्णा आंधळे यास सरकारने तात्काळ अटक करावे, अन्यथा चार महिन्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन उभे करण्याच इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिला.
न्यायासाठी आता पुन्हा रास्त्यावर उतरावे लागणार आहे. येत्या काळात आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी लवकरच मस्साजोग येथे राज्यव्यापी बैठकीची घोषणा करत बैठकीसाठी नियोजीत ठिकाण, पार्किंग, पाणी आदी व्यवस्थेचा आढावत घेत जरांगे पाटील यांनी जागेची पाहणी केली.



Comments