देशाच्या राजकारणात 19 डिसेंबरला मोठा भूकंप, मराठी माणुस पंतप्रधानपदी विराजमान होणार - पृथ्वीराज चव्हाण
- Navnath Yewale
- 16 hours ago
- 2 min read

देशाच्या राजकारणात 19 डिसेंबरला मोठा राजकीय स्फोट होणार? अमेरिकेतील एका ‘स्टिंग ऑपरेशन’मुळे भारतातील सत्ता समीकरणे बदलणार? आणि या सर्व उलथापालथीनंतर ‘ मराठी माणूस’ थेट देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार? असं खळबळजनक भाकित महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.
चव्हाण यांच्या भाकितामुळे देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. ‘उप्स्टाईन फाईल्स ’ आणि अमेरिकेतील एका गुप्तहेराच्या स्टिंग ऑपरेशनचे संदर्भ देत चव्हाण यांनी आंतरराष्ट्रीय घटनांचा थेट भारतीय राजकारणावर होणार परिणाम स्पष्ट केला आहे.
दरम्यान, चव्हाण यांनी नुकतेच माध्यमांशी बोलताना अमेरिकेत घडणार्या एका महत्वपूर्ण घटनेचा संदर्भ दिला आहे. त्यांनी याबाबत दावाही केला आहे. अमेरिकेतील ‘गुप्तहेर’ आणि स्टिंग ऑपरेशन, अमेरिकेत एका व्यक्तीने (जो इस्त्रायलचा गुप्तहेर होता) अनेक दिग्गज व्यक्तींच्या बंगल्यात कॅमेरे लावून मोठे स्टिंग ऑपरेशन केले आहे.
त्यानुसा सरकार एक नवीन कायदा करून,19 डिसेंबरला या ‘ दिग्गजांची ’ नावे सार्वजनिक करणार आहे. अमेरिकेतील या खुलाशांमुळे जगात मोठा राजकीय धुमाकूळ माजण्याची शक्यता आहे आणि त्याचे पडसाद भारताच्या राजकारणावरही उमटणार आहेत.
याआधी, त्यांनी ‘एप्स्टाईन फाईल्स’ मुळे अमेरिकेत सुरू गोंधळाचा उल्लेख केला होता. या कागदपत्रांचे तपशील पूर्णपणे उघड झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भारताच्या राजकारणावरही उमटणार आहेत.
याआधी, त्यांनी ‘एप्स्टाईन फाईल्स’ मुळे अमेरिकेत सुरू असलेल्या गोंधळाचा उल्लेख केला होता. या कादगपत्रांचे तपशील पूर्णपणे उघड झाल्यास, त्याचे गंभीर परिणाम भारताच राजकारणावरही होती, असे त्यांनी स्पष्ट केले होते.
पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट 19 डिसेंबर ही तारीख देऊन राजकीय तर्क-वितर्कांना चालना दिली आहे.
स्टिंग ऑपरेशनमुळे अमेरिकेतील जे मोठे नेते अडचणीत येणार, त्याचा थेट परिणाम भारतीय सत्ताधार्यांवर कसा होईल, याबद्दल त्यांनी अधिक स्पष्टीकरण दिले नसले तरी, याच राजकीय उलथापालथीमुळे देशाच्या पंतप्रधानपदी मराठी व्यक्ती विराजमान होण्याची शक्यता निर्माण होईल, असे त्यांचे भाकीत आहे.
“ या यादीत कोणाकोणाची नावे आहेत, याची मला फारशी कल्पना नाही, “ असे सांगून चव्हाण यांनी अधिक तपशील देण्याचे टाळले. मात्र, एका ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्याने एवढ्या आत्मविश्वासाने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा हवाला देत थेट देशाच्या सर्वोच्च पदाबद्दल भाकीत करणे, या घटनेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. येत्या 19 डिसेंबरला अमेरिकेत कोणता गौप्यस्फोट होणार आणि त्याचे भारतीय राजकाणावर कसे परिणाम उमटतात, याकडे देशातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागू राहिले आहे.



Comments