देहविक्रीला हे तयार असतील तर गिर्हाईक आहेतच- राज ठाकरे
- Navnath Yewale
- Jul 1
- 1 min read

मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा खासदारांच्या फुटीनंतर काल विधानपरिषदेचे आमदार सचिन आहिर यांनीही उद्धव ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र करत शिंदे सेनेकडून विधानपरिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्ज भरला. राज्यात खासदार आमदारांच्या फुटीवर प्रतिक्रिया उमटत असतानाच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार मागील आठवड्यात शिंदे गटात सहभागी झाले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदारांच्या मतदार संघाचा दौरा करत गद्दार म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला. प्रत्यक्षात उद्धव ठाकरे यांचा दौरा सुरू असतानाच मंगळवारी (दि.30) आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे सचिन आहिर यांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटाकडून विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केला.
दरम्यान, खासदार, आमदारांच्या पक्षबदलावरून विरोधकांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सत्ताधारी महायुतीसह बंडखोरांवर जहरी टीका केली आहे. राज ठाकरे म्हणाले की, “प्रश्न विकत घेणार्यांचा नाही तर विकले जाणार्यांचा आहे, देहविक्रीला हे तयार असतील तर गिर्हाईक आहेतच” असे परखड मत व्यक्त करत त्यांनी सत्ताधार्यांसह बंडखोर खासदार, आमदार यांच्यावर निशाणा साधला



Comments