top of page

दोन्ही पक्षांच्या विलिणीकरणा विरोधात कट शिजला, विजय वडेट्टीवारांच्या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ


राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने राज्यात शोककळा पसरली आहे. अजित पवार मुंबईहून बारामतीला निघाले असता त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. विमान अपघातात अजित पवार गंभीर जखमी आहे, असे सुरुवातील सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर थेट अजित पवारांच्या निधनाची बातमी आली. अजित पवार यांचा तेरावा होण्यापूर्वीच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावरून आता राजकारण रंगताना दिसत आहे. दुसरीकडे शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल आपल्याला कोणतीही कल्पना नाही असे म्हणत दु:खव्यक्त केले. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर आता अनेक शंका देखील उपस्थित केल्या जात आहेत. अनेकांनी हा कट असल्याचेही म्हटले आहे. या विमान अपघाताची चौकशी केली जात असून सीआयडीची तपास पथक स्थापन करण्यात आलं आहे.


अजित पवार यांच्या निधनानंतर विजय वडेट्टीवार यांनी मोठे विधान केले आहे. विजय वडेट्टीवार विलगीकरणाबद्दल बोलताना म्हणाले की, अजित पवारांनी का कल्पना दिली किंवा सांगणे आवश्यक आहे का? हा त्या पक्षाचा निर्णय आहे. भारतीय जनता पक्षाला का सांगितले नाही? किंवा त्यांना सांगितल्याशिवाय पुढचा कार्यक्रम ठरत नाही का? मग हा पक्ष भारतीय जनता पक्ष म्हणेल, त्याच पद्धतीने चालतो का? पण एक खरंय दोन पक्ष एकत्र येऊ नये म्हणून हा कट कुठेतरी शिजला आणि त्यातून ही ठिंणगी पडली, असे मला वाटते, असे थेट आरोप विजय वडेट्टीवार यांनी केले आहेत.


पुढे बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, खरंतर आपल्या संस्कृतीला आणि आपल्या हिंदू परंपरेला धरून हा शपथविधीचा कार्यक्रम झाला असं कोणीच मानायला तयार नाही. हा निर्णय सुनेत्रा ताईंनी एवढ्या घाईने का घेतला असं लोकांचं मत आहे, कदाचित भाजपच्या दबावापुढे असा निर्णय झाला असावा.


कारण विलीणीकरण होवू नये अशी भूमिका भाजपची होती आणि त्यातून भाजपला नेहमी दादांच्या बरोबर राहून भाजपचा बरोबर वाटाघाटी करणारे जे नेते आहेत त्या नेत्यांची इच्छा सुद्धा नव्हती. दशक्रिया झाल्याशिवाय कुठलाही पदभार घेऊ शकत नाही. काल भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी सांगितलं की इंदिराजींचा मृत्यू झाल्यानंतर लगेच पंतप्रधान राजीव गांधीची नियुक्ती झाली, निवड झाली. पण काही लोकांना कळत नाही की ते पद संविधानीक आहे आणि पंतप्रधानपद एकही दिवस रिकामं ठेवता येत नाही. उपमुख्यमंत्री पद हे काही संविधानीक पद नाही त्यामुळे तेरावीचा कार्यक्रम झाल्यावर शपथविधी करता आला असता. शशिकांत शिंदे यांनीही असं सांगितलं आहे. वडेट्टीवार यांनी शपथविधीवरून राजकारण घाणेरडं आणि सडकं झाल्याचं म्हणत खेद व्यक्त केला.

Comments


bottom of page