top of page

दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीवर अजित पवार स्पष्टच बोलले अंजली दमानियांच्या मागणीलाही उत्तर


पुणे : पुणे जमिन खरेदी गैरव्यवहार प्रकरणावरून अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजीनाम्याचीच मागणी केली. अजित पवारा हे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री आहे. त्यामुळे निष्पक्ष चौकशी कशी होणार? असा सवाल अंजली दमानिया यांनी केला.


दरम्यान अंजलि दमानिया यांच्या मागणीला दादांनी पुण्यात उत्तर दिले आहे. तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस युती करणार यावर देखील ते व्यक्त झाले आहेत. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. आगामी निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस युती करणार का? यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, आज मला पुण्यातले स्थानिक पदाधिकारी, दोन्ही शहराध्यक्ष सगळे माजी नगरसेवक आणि आमदार भेटले. त्यांना मी सांगितलं आहे की, तुम्ही चाचणी करा मी परत दोन दिवसांनी येतो आणि त्याबद्दल निर्णय घेऊ. अजून महानगरपालिकेचा कार्यक्रम जाहीर झाला नाही.


त्यामुळे काय काय होतं आणि कसं कसं होतं ते पहावं लागेल. निवडणुका होऊन खूप दिवस झाले आहेत. आज आम्ही महायुतीमध्ये आहोत महायुतीमध्ये आमचं काम सुरू आहे. पण आता नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत. कुठल्या कुठल्या शहरात काय काय घडतं हे साधारण लवकर समजेल अंदाज येईल. अंदाज आला की पुढच्या गोष्टी ठरवता येतील. माझं शरद पवार साहेबांशी बोलणं झालं नाही. कार्यकर्ते त्यांच्या भावना मांडत असतात, मी सगळ्या भागातल्या सहकार्‍यांना सांगितलं आहे की तुम्ही चाचपणी करा आणि ठरवा.. आम्ही पहिली निवडणुक लढत नाहीत आम्ही लोकांनी अशा कित्येक निवडणुका लढल्या आहेत हे आम्हाला नवीन नाहीत आमच्यामध्ये एकोपा राहुन निवडणुका लढू. सगळ्या सहकार्‍यांशी चर्चा करू आणि युतीबाबत काय तो योग्य निर्णय घेऊ. आम्ही आच्या पक्षाचे बघू तुम्ही काळजी करू नका.


मला योग्य वाटेल ते मी करेल: पुणे जमिन खरेदी गैरव्यवहार प्रकरणाची पारदर्शक पद्धतीने चौकशी व्हावी यासाठी अजित पवार यांनी राजीनामा द्यावा या अंजली दमानिया यांच्या मागणीवर अजित पवार म्हणाले की, माझ्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून मला योग्य वाटेल ते मी करेल.


दरम्यान पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर बोलताना अजित पवार म्हणाले की, अल्पवयीन मुलं गुन्हेगारीत येत आहेत. 14 वर्षाखालील 15 वर्षाखालील मुलं गुन्हे करत आहेत. अल्पवयीन मुलाचे वय 18 वर्षे आहे ते काढून कमी करावं हे केंद्र सरकारच्या देखील लक्षात आणून देत आहोत. काही चुकीचे लोक त्यांचा हेतू साधण्याकरता अल्पयीन मुलांना सामावून घेत आहेत. कारण ते अल्पवयीन असल्यामुळे गुन्हा दाखल करायला अडचणी येतायत.

Comments


bottom of page