धनंंजय मुंडे अजितदादा, फडणवीसांच्या पायावर पडलं, त्यांनी क्लिन चिट दिली- जरांगे पाटील
- Navnath Yewale
- 1 day ago
- 2 min read

नवी मुंबई/ पनवेल: माझ्या घातापात प्रकरणातील तीनही आरोपींनी कबुली दिलेली असताना धनंजय मुंडे यांना चौकशीसाठी अटक नाही. धनंजय मुंडे अजितदादा आणि फडणवीसच्या पायावर पडलं, त्यांनी क्लिन चिट असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी पनवेल येथे पत्रकार परिषदेत केला.
नवीमुंबई क्षेत्रातील मराठा बांधवांनी पनवेल येथे मराठा भवन स्थापन केले आहे. काल रविवारी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठा भवनाचे उद्घाटन करण्यात आले. पनवेल मध्ये जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेतून धनंजय मुंडे यांच्यावर घणाघात करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनाही इशरा दिला.
जरांगे पाटील म्हणाले की, माझ्या घातापाताचा कट रचणार्या तीनही आरोपींनी स्पष्ट कबुली दिली असताना जालन्याचे पोलिस अधिक्षक आणि राज्याच्या गृहविभागाने धनंजय मुंडे यांना चौकशीसाठी ताब्यात अथवा अटक केली नाही. एवढा स्पष्ट पुरावा असताना अटक होत नाही. अशी माहिती आहे की,धनंजय मुंडे अजित दादा आणि फडणवीस यांच्या पायावर पडला आणि म्हणला मला या घातापातच्या प्रकरणातून वाचावा, त्यांनीही त्याला क्लिन चिट दिली पण याचे परिणाम येणार्या काळात वाईट होणार आहेत. अजित दादांनी असले विषारी, वाईट कृत घडवून आणणारे लोक पाळायला नाही पाहिजेत.
संतोष देशमुखांचा यांनी खून घडवून आणलेला आहे. मुख्य आरोपीसोबत याचे 48 कॉल झाले आहेत. महादेव मुंडे, बापु आंधळे प्रकरणातलं सुद्धा माहिती आहेत त्याला. खून घडवून आणणार्यांना अजित दादा सांभाळत आहेत. धनंजय मुंडे ला सर्वात जास्त बळ कोण देत असंल तर अजित दादा. पण एकदिवस अजित दादा तुमच्या पक्षाला सुद्धा याचं खूप नुकसान भोगावं लागणार आहे.
अजित दादा तुम्हाला खोटं जमत नाही असं म्हणता, हा घातापाताचा प्रकार खरा आहे, अन्यथा चला नार्कोटेस्टला. आरोपी न्यायदेवतेने सोडले काय पोलिसांनी सोडले याचं आम्हाला काही फरक पडत नाही. माझ्या घातापाताची आडीच कोटी रुपयाला सुपारी दिल्याचे माझ्या समाजाच्या कोर्टात सिद्ध झालं आहे.
आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजना छगन भूजळ यांनी अजित दादा आणि फडणवीसांना सांगितलं आणि बंद पाडल्या. मंत्रीपदाचा दर्जा असलेले नरेंद्र पाटील यांच्या माध्यमातून उद्योजक घडवण्याचं काम सरकारला करायचं होतं पण योजना बंद पाडून उद्योजकच बुडवण्याचं काम केलं.
शिंदे समितीने नोंदी शोधण्याचं काम बंद आहे, काही अधिकारी जानिवपूर्वक प्रमाणपत्र देत नाहीत. हैद्राबाद गॅझेटीआर नुसार प्रमाणपत्र देण्याचं काम गतीने सुरू करावं अन्यथा राज्यात पुन्हा आंदोलन उभं राहणार. या अधिवेशनात शेतकर्यांकडून बँकांची वसूलीसाठी नोटीसा बदं करून शेतकर्यांना पिक कर्ज देण्याचा अध्यादेश काढा. शेतकर्यांनी मतदानातून आपली ताकद दाखवली तरच सरकार भिणार आहे. मराठ्यांच्या लक्षात आलं आहे, मुला- बाळांना सक्षम बनवण्यासाठी आरक्षण महत्वाचं आहे. सर्वपक्षीय आमदार, मंत्री मला भेटतात काम चांगलं आहे म्हणतात. फडणवीस वगळता.
पूर्वीचे फडणवीस आम्हाला दिसावेत: अन्याय करणार्यांवर कारवाई करणारा पूर्वीचा देवेंद्र फडणवीस आम्हाला दिसत नाहीत. अन्याय करणार्यांना पाठीशी घालण्याचं काम सद्धा फडणवीस करीत आहेत. न्याय देणारा पूर्वीचा फडणवीस आम्हाला दिसावेत.



Comments